27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriविनायक राऊत निधी आणण्यात कमी पडले - प्रमोद जठार

विनायक राऊत निधी आणण्यात कमी पडले – प्रमोद जठार

विकास कामे आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार नसल्यामुळे कोकणची पीछेहाट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून दिल्यास कोकणचा विकास होईल कारण विकास कामांसाठी निधी आणण्याची ताकद केवळ भाजपमध्ये आहे असे प्रतिपादन भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विद्यमान खासदार विनायक राऊत विकासनिधी आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप देखील त्यांनी केला. माजी आ. प्रमोद जठार दोन दिवस चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था भक्कम होत असताना माझा कोकण मात्र मागे आहे.

कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणच्या विकासासाठी निधी देण्यास तयार असून सुद्धा इथले खासदार निधी आणण्यात कमी पडले. त्यांना कोकण विकासाचे मॉडल लोकसभेत मांडता आले नाही. मागील दहा वर्षात त्यांनी एकही मोठा कारखाना आणला नाही. देशात २०१४ पासून मोदी लाट सुरू झाली. त्याचा फायदा घेऊन विनायक राऊत खासदार झाले पण त्यांना मतदारसंघाचा विकास करता आला नाही. खासदार झाल्यानंतर राऊत यांनी सत्तेची साथ सोडली त्यामुळे मतदारसंघ मागे राहिला, असा आरोप देखील जठार यांनी पत्रकार परिषदेत केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा भाजपने तयार केला आहे. येथील विकास कामे आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.

आंबा, काजू, पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि लहान मोठ्या उद्योगातून कोकणचा विकास करणे शक्य आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र – सरकारची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. जगात मोदींच्या नावाचा गवगवा सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण शहर मंडळ अधिकारी श्रीराम शिंदे, तालुका सरचिटणीस एकनाथ सहस्रबुद्धे, शहर सरचिटणीस निनाद आवटे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष समीर पवार, सहकार सेल जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, जिल्हा चिटणीस गणेश हळदे, तालुका प्रसिद्धीप्रमुख मंदार कदम, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष शैलेश लब्दे, जतीन घटे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular