नगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असतानाच भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. चिपळूण येथे कार्यक्रमा दरम्यान राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान राजेश सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांची सभादेखील रद्द करत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सिंधुदुर्गकडे रवाना झाले. मंगळवारी आचारसंहिता लागू झाली, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर होते. नगरपालिका निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी दौऱ्यावर होते. सकाळी खेड येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मागदर्शन केले. त्यानंतर ते चिपळूणला दाखल झाले. चिपळूण येथे सभेनंतर दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आ. रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत असे सांगून त्यांनी आपले राजीनामा पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले.
रत्नागिरीत खळबळ – राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्याची बातमी वाऱ्यासारखी रत्नागिरीत पसरली आणि भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयाकडे धाव घेतली तर काही पदाधिकारी सभेनिमित्त आधीच कार्यालयात आले होते.
जय्यत तयारी – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण रत्नागिरीत येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली होती.. भला मोठा हार क्रेनला बांधण्यात आला होता. मोठ शक्तीप्रदर्शन करुन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वागत केले जाणार होते. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर आदी ठिकाणाहून पदाधिकारी व कार्यकर्ते

