25.2 C
Ratnagiri
Wednesday, February 12, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriमाजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात पुन्हा चौकशी

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात पुन्हा चौकशी

नाईक दांपत्य मंगळवारी दुपारी १२ वाजता चौकशीसाठी रत्नागिरीत दाखल झाले.

शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यामागचा एसीबीचा ससेमिरा अद्याप सुरूच असून मंगळवारी वैभव नाईक व त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात पुन्हा चौकशी झाली. माझ्यावर कितीही दबाव येऊद्या मी झुकणार नाही, असा इशारा देत एसीबी चौकशीला माझं कुटुंब सामोरं जाईल असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात मंगळवारी चौकशी झाली. नाईक दांपत्य मंगळवारी दुपारी १२ वाजता चौकशीसाठी रत्नागिरीत दाखल झाले. यावेळी वैभव नाईक यांनी आपण एसीबीला पूर्ण सहकार्य करणार, आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या. त्या प्रकारे आपण तपासात सहकार्य केले आहे. निवडणुकीपूर्वी देखील अशीच चौकशी सुरू होती. आर्थिक मालम त्तेचा सर्व लेखाजोखा पुराव्यासहीत यापूर्वीच एसीबी अधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांना अजून वेगळ्या फॉरमॅट मध्ये माहिती हवी आहे. यासाठी आम्ही दोघेही ही माहिती घेऊन याठिकाणी आलोय असे त्यांनी सांगितले.

दुपारी १२ वा. एसीबी कार्यायात दाखल झालेल्या माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांची तब्बल साडेसहा तास एसीबी कार्यालयात चौकशी सुरू होती. सायंकाळी साडेसहा वाजता एसीबी कार्यालयातून वैभव नाईक व त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे दोघे बाहेर पडले. या चौकशीवेळी नाईक दांपत्याने संपत्तीची विविध कागदपत्रे दाखल केली. मागच्या दोन वर्षांमध्ये तीन वेळा आतापर्यंत मी चौकशीसाठी हजर राहिलो. आमच्या चौकशीमध्ये माझा आणि माझ्या पत्नीचा इन्कम सोर्स, शिवाय खरेदी केलेल्या जागा यांची माहिती मागितली गेली. संपूर्ण माहिती मी त्यांना हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये दिलेली आहे. शिवाय, त्यांनी आणखीन देखील काही माहिती मागितलेली आहे. ती माहिती देखील त्यांना दिली जाईल. चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आम दार वैभव नाईक यांनी दिलेली आहे. रत्नागिरीतील एसीबी कार्यालयांमध्ये वैभव नाईक आणि त्यांची पत्नी त्यांची जवळपास साडेसहा तास चौकशी झाली. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

RELATED ARTICLES

Most Popular