25 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeKhedप्रशासनाचा संतापजनक कारभार; जिवंत असूनही मृत नोंद असल्याने महिला मतदानापासून वंचित

प्रशासनाचा संतापजनक कारभार; जिवंत असूनही मृत नोंद असल्याने महिला मतदानापासून वंचित

सरकारी कामकाजातील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

मतदार यादीत तुमच्या नावाची मृत अशी नोंद असेल, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. ७ मे रोजी, मंगळवारी राज्यासह देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. रायगड-रत्नागिरी मतदारसंघातही तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं. मात्र, एक महिला विचित्र कारणामुळे मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याची घटना घडली आहे. आपल्या नावासमोर मृत असा शिक्का पाहताच महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. यामुळे सरकारी कामकाजातील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

एका बाजूला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शासनाकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ती जिवंत असून देखील मतदार यादीमध्ये ती मृत असल्याची नोंद असल्याने मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं आहे. ही घटना रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदार संघातील खेड शहरातल्या एलपी इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे.

जिवंत मतदाराची मृत अशी नोंद – महिला जिवंत असून देखील मतदार यादीत तिचे नाव डिलीट झाल्याचा शिक्का मारण्यात आल्याचं निदर्शनास आल्यानंतर, त्या महिलेने मतदान केंद्रप्रमुखांशी विचारणा केली असता ही व्यक्ती मयत झाली असून मतदान करता येणार नाही, असं सांगण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मात्र त्या महिलेने तिथे ओळखपत्र आणि मतदार यादी क्रमांक सांगून ही व्यक्ती मीच आहे, असं पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं. मात्र मतदार यादीत तुमचं नाव डिलीट असल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे मतदान केंद्र प्रमुखांनी या महिलेला सांगितल्याची माहिती संतप्त सुरात या महिलेने पत्रकारांना दिली.

नेमकं काय घडलं? – या महिलेने पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की, सावित्री लक्ष्मण बिर्जे असे तिचे नाव आहे. रायगड लोकसभा मतदार संघाच्या दापोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक २५७ खेडमधील मतदार क्रमांक ९४३ या मतदार यादीत त्यांचे नाव आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्या मतदान करण्यासाठी गेल्या असता मतदानासाठी लागणारे ओळखपत्र असूनदेखील त्यांना मतदान करता आले नाही. मतदान केंद्र प्रमुखांनी ही व्यक्ती मयत झाल्याकारणाने मतदार यादीतून नाव डिलीट झाले असल्याचे सांगितले. अखेरीस सावित्री बिर्जे या मतदानापासून वंचित राहिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular