कोणी निंदा… कोणी वंदा… आमचा विकासाचा वादा…एकच अजितदादां… शेखर निकमाना पुन्हा एकदा निवडूण आणा म्हणजे चिपळूण संगमेश्वर मतदार संघ विकासकामाने नावा रूपास येईल… असा विश्वास हस्यजत्राफेम विनोदी अभिनेते आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचार भाऊ कदम यांनी कळंबस्ते येथे व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार शेखर निकम याच्या प्रचारसभेचे आयोजन कळंबस्ते येथे करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाप्पा सावंत माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती शौकतभाई मुकादम भाजपचे नेते रामदास राणे, भाजपच्या नेत्या सौ चित्रा चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापू आयरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, शिवसेनेचे दिलीप चव्हाण आदी म ान्यवर उपस्थित होते. यावेळो विनोदी अभिनेते भाऊ कदम बोलत होते. भाऊ कदम यांनी बोलण्यास सुरवात करताच जोरदार टाळ्यांचा गजर करण्यात आला… ‘हसताय ना हसायलाच पाहिजे, असे म्हणताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला… मला भाषण करता येत नाही… मला अजितदादानी डेअरिंग करायला लावली आहे… राजकारण आपल्याला माहीत नाही.
अजितदादा कसे आहेत मला माहित नव्हते मात्र त्याच्या बद्दल ऎकले आणि पाहिले तेव्हा कळले की हा माणूस किती धडाडीने काम करतो आहे’, असे भाऊ कदम म्हणाले. मला विरोधकांवर काही बोलायचे नाही. पण मला इथे महिती मिळाली आहे की, शेखरसरांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. मात्र काही ठिकाणी टिका होते आहे मात्र कोणी निंदा… कोणी वंदा… आमचा विकासाचा वादा आहे, असे भाऊ कदम म्हणताच पुन्हा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. शेखर सरांना तुम्ही खंबीर साथ देतं आहात हे बघून मला आनंद झाला. या पुढे ही चांगलेच घडणार आहे कारण शेखरसर हा माणूस प्रामाणिक आणि साधा आहे त्यांना भरघोस मताने निवडून द्या. अजितदादाना मुख्यमंत्री करण्यासाठी शेखरसरांना निवडून द्यायलाच हवे, असे आवाहन भाऊ कदम यांनी केले. पाच वर्षात शेखर निकम यांनी भरघोस निधी आणून गाववाडीवर विकासाची कामे केली आहेत.
अजून त्यांना संधी द्या. तुमच्या चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे नाव विकासात ते नावारूपास आणतील, असा विश्वास भाऊ कदम यांनी व्यक्त केला. शेखरसरांनी माझ्याकडे नावाचा कागद दिला त्याचे अक्षर खूप सुंदर आहे… माझंही अक्षर खूप सुंदर आहे… शाळेत मला माझे शिक्षक दहा दहा वेळा तेच ते लिहून आणायला सांगायचे. एवढे अक्षर सुंदर आहे (जोरदार हशा) मी हुशार विद्यार्थी असल्याने माझ्या आरोग्याची काळजी माझे शिक्षक घेत असत… पहाटेच मला शाळेच्या बाहेर उभे करायचे… विटामिन डी घेण्यासाठी… अनेक वेळा वर्गात उभे करायचे… मला काही बोलायचे नाही कारण मी हुशार ना! माझ्या वडिलांजवळच शिक्षक बोलत असत, तसा मी हुशार होतो, असे त्यांनी सांगताच हजारोच्या गर्दीने उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करीत हास्याचा खळखळाट केला.