26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeRatnagiriउनाड सोडलेल्या गुरांच्या मालकांची नावे पोलीस दप्तरी नोंदवा

उनाड सोडलेल्या गुरांच्या मालकांची नावे पोलीस दप्तरी नोंदवा

संगमेश्वर परिसरात मोकाट गुरांची संख्या दिवसांगणिक वाढत चालली आहे.

संगमेश्वर शहरात मोकाट गुरांची समस्या आता चांगलीच ऐरणीवर आली आहे. लोकवस्तीसह शहरातील अंतर्गत रस्ते बाजारपेठ जेथे जाल तेथे कळपा – कळपाने गुरें व लहान लहान वासरे सैरवैर हिंडताना तसेच ठाण म ांडून बसलेले पहायला मिळत आहेत. या गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात व पोलीस पाटील यांच्या मदतीने उनाड सोडण्यांत आलेल्या गुरांच्या मालकांची नावे पोलीस ठाणे दप्तरी नोंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन संगमेश्वर पोलीस उपनिरीक्षक शंकर नाग्रगोजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. संगमेश्वर परिसरात मोकाट गुरांची संख्या दिवसांगणिक वाढत चालली आहे.

मोकाट सोडण्यात आलेली गुरे खाद्य शोधार्थ सर्वत्र सैरवैर भटकंती भटकंती करत असतात तेही कळपा कळपाने तसेच पादचारी व वाहन वर्दळीच्या रस्त्यावर रस्ता अडवून ऐसपैस ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे वाहन वर्दळीला अडथळा तर निर्माण होतोच परंतु रात्रीच्या वेळी अपघात होण्यास ही कारण ठरत असून यापूर्वी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. गुरे तसेच लहान वासरे अचानकपणे वाहनांच्या समोर येऊन अपघाताच्या घटना घडून त्यात काही दोष नसताना बिचाऱ्या मुक्या गुरांना जीव गमवावा व जखमी होऊन जायबंदी ही व्हावे लागले आहेत. संगमेश्वर परिसरतील दिवसांगणिक वाढत चाललेली मोकाट गुरांची संख्या अतिशय त्रासदायक ठरत असून याला वेळीच पायबंद घालण्यासाठी संगमेश्वरवासीय एकवटले असून नुकतेच संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून आजूबाजूच्या गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने उनाड सोडण्यात आलेल्या गुरांच्या मालकांची नावे पोलीस ठाणे दप्तरी नोंद करण्यात यावे व गुरे उनाड सोडू नये या संदर्भात

सूचना करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बयान मेश्वर पोलीस ठाणे उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांच्याकडे निवेदन सादर करताना अपर्णा अनिल भिडे, उदय संसारे, दादा कोळवणकर, सुशांत उर्फ रिंकू कोळवणकर, गुरूप्रसाद (दादु) भिंगार्डे, विवेक उर्फ बाळ्या शेट्ये, पंकज कोकाटे, ‘सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये, स्वप्निल नारकर, संजय पाथरे, संतोष खातु, राहुल कुचेकर, विनीत खातु, संजय चौधरी, वैभव मुरकर, अभिषेक खातु, पिंका खातु, नितीन शेट्ये आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular