लोटे परशुराम येथील एमायडीसी एरियातील कंपन्यांनी १५ ऑगस्ट रोजी व्यवस्थित न होणारा पाणीपुरवठा आणि वीज संदर्भात कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून कंपनी बंदचे आंदोलन करण्याचे ठरवलेले. त्या प्रकाराचे निवेदन त्यांनी शासनाला सुद्धा दिले होते.
MIDC एरिया मध्ये जास्तीत जास्त रासायनिक व्यवसायाचे कारखाने असल्यामुळे त्यासाठी वेळेवर वीज पुरवठा आणि योग्य पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे, असे असून सुद्धा मागील वीसे एक दिवसापासून प्रशासन या अडचणींकडे लक्ष देत नसल्याने, व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत आहे. या सर्व बाबतींवर तोडगा निघण्यासाठी म्हणून दिनांक १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी सर्व व्यवसायिकांनी मिळून कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून कंपनी बंद आंदोलन करण्याचे ठरवलेले. अखेर शासनाने लोटे परशुराम येथील जुनी पाण्याची पाईपलाईन बदलून तिथे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होण्याचे आश्वासन दिले आहे. जेणेकरून व्यावसायिकांना कारखान्याच्या कामासाठी पाण्याचा योग्य पुरवठा करता येईल. सदरचे पाण्याची पाईप लाईन १९८२ साली टाकण्यात आली होती असून ती आता कमकुवत झाल्याने वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे एक तर पाण्याचा अपव्यय होऊन पाणी फुकट जाते आणि कारखान्यासाठी असणाऱ्या पाण्याच्या अनियमिततेमुळे त्याचे नुकसान व्यवसायिकांना सोसावे लागते.
या सगळ्याचा सारासार विचार करून प्रशासनाने अखेर त्या पाणी पाईप लाईनची दुरुस्ती हातात घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चिपळूण चे उपअभियंता यांनी दिली आहे.