29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriविहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवले ग्रामस्थांची सतर्कता, वनविभागाची तत्परता

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवले ग्रामस्थांची सतर्कता, वनविभागाची तत्परता

बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचे दिसून आले.

तालुक्यातील कुरतडे कातळवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे व वनविभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला अवघ्या काही मिनिटात विहिरीबाहेर काढले. रविवारी कुरतडे कातळवाडी येथील मंगेश पांडुरंग फुटक यांचे घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला. याबाबतची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन कुरतवडेमधून दूरध्वनीद्वारे वनविभागाला कळविण्यात आली. माहितीच्या अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे आढळूण आले.

बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचे दिसून आले. बिबट्याला अवघ्या दीड मिनिटात ग्रामस्थाच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी मालगुंड स्वरुप काळे यांनी पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा साधारणपणे ४ ते ४.५ वर्षाचा असून ती मादी आहे. ती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबतचा अहवाल दिला. त्यानुसार वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

वन विभागाचे बचाव पथकामध्ये प्रकाश सुतार (वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी), न्हानू गावडे (वनपाल पाली), प्रभू साबणे (वनरक्षक रत्नागिरी), मिताली कुबल (वनरक्षक जाकादेवी), रेस्क्यू बचाव पथकामध्ये सरपंच सलोनी बंडवे, पोलीस पाटील रमेश आये, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुतो जगताप व त्याचे कर्मचारी तसेच सागर तारी, अनिकेत मोरे, दिनेश चाळके, डॉ. भागवत यांनी सक्रिय सहभाग घेत बिबट्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढले. सदर बचाव पथकास विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे व मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी, निलेश बापट यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular