26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriकोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासून

कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासून

मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडते.

कोकणात मोठ्या स्वरुपात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह गणपती उत्सव तिकिट आरक्षण येत्या २३ जून पासून सुरु करीत आहे. कोकण रेल्वे पावसाळी वेळापत्रकात बदल करुन आता गणपती स्पेशल आरक्षण कोकणातील चाकरमान्यांसाठी सुरु करत आहे. २७ ऑगस्टला गणेशोत्सव सुरू होणार आहे. कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाड्या दरवर्षीप्रमाणे याहीवेळी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी ६० दिवस आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासुन सुरु करावे लागणार आहे. तरीही गणेश चतुर्थीच्या आधी २ दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने २५ आणि २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असते.

मागीलवर्षी गणपती उत्सवाची सुरुवात शनिवार दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी झाली होती. यावर्षी बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होत आहे. त्यामुळे ६० दिवस आधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा तक्ता कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केला. आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्यामुळे मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडते. या गाड्यांना देखील मोठी गर्दी असते. मुंबई गोवा मार्गाची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे यावर्षी देखील जास्त चाकरमानी रेल्वेतून प्रवास करण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कोकण रेल्वेकडून तयारीला सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular