25.4 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriआम्ही घरी बसणारे नाही… शासनच दारी घेऊन आलो! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही घरी बसणारे नाही… शासनच दारी घेऊन आलो! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही घरी बसून काम करणारे नाही…फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारेही नाही, तर थेट जनतेत जावून काम करणारे आहोत….म्हणूनच आम्ही घरी न बसता जनतेच्या दारी सरकार घेऊन आलो आहोत. मागील काही वर्षात निर्माण झालेले सर्व स्पीडब्रेकर्स आम्ही काढून टाकले आहेत. त्यामुळे. आता सरकारची विकासाची गाडी सुसाट सुरू झाली आहे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी जी धारणा झाली आहे ती बदलण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे उद्गार राज्यांचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. ते ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीत बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणसाठी मुंबई ते सिंधुदुर्ग असा नवा ग्रीनफिल्ड महामार्ग होणार असल्याची घोषणा केली. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत रत्नागिरीत गुरूवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी येथील स्व. प्रमोद, महाजन क्रीडा संकुलात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. हजारो लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ना. दादा भुसे, ना. उदय सामंत, ना. शंभूराज देसाई, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आम्ही थेट जनतेत जातो – यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अनेक टोले लगावले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. आम्ही घरात बसून काम करणारे नाहीत, आम्ही फेसबुक लाईव्ह करीत नाही. थेट जनतेत जावून फिल्डवर्क करतो, असा टोला त्यांनी लगावला. मागील अडिच वर्षाचे सरकार सर्वांनी पाहिले आणि आताचे सरकार सर्वांना ज्ञात आहे. हे गतीमान सरकार असल्याचे ते म्हणाले.

हे सुराज्य व्हावं – स्वराज्याचं सुराज्य व्हावं हे छ. शिवाजी महाराजांचे ध्येय होते आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे राज्य सुराज्य म्हणून ओळखले जावे यासाठी ऐतिहासिक निर्णय आम्ही घेत आहोत. आतापर्यंत कॅबिनेटच्या ३५ बैठका झाल्या असून ३५० निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे झाले असल्याचे त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले.

आम्ही जनतेच्या दारात आलोय –  आमचा अजेंडा सर्वसामान्यांना चांगले दिवस आणणे हा आहे. हे शासन सर्वसामान्य जनतेचे आहे. यापूर्वी अडिच वर्षाचा कारभार साऱ्यांनी पाहिला आहे. आम्ही घरी न बसता जनतेच्या दारी सरकार घेऊन आलो आहोत, अशी मिश्कील टिपणी त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
हे वाक्य बदलायचेय! –  सरकारी काम म्हटलं की साऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य येतं. सरकारी काम आणि सहा महिने थांब… मात्र हेच वाक्य आपल्याला बदलायचे असून सरकारी काम विनाविलंब कंसे होईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वीच्या सरकारमुळे शासनाप्रती जनतेचे जे मत निर्माण झाले ते बदलायचे आहे असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

काम करणारे कार्यकर्ते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर वारंवार टीका केली. आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. कालही कार्यकर्ते होतो, आजही आहोत आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनदेखील वेगवान – सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, अन्य अधिकारी. तलाठी हे गावागावात जाऊ लागले आहेत. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत. ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या गावाचा, शहराचा, त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत: आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करु लागले आहेत. यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते, त्याचा लाभ लोकांना मिळतो, असं ना: मुख्यमंत्री म्हणाले.

७५ हजार लोकांना नोकऱ्या – आपल्या सरकारने आल्या आल्या ७५ हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला. बहदा हे असे पहिले सरकार आहे जे लोकांना बोलवून त्यांन नियुक्त्या देते. सर्वसामान्य लोकांच भलं करणं हेच आमचं लक्ष्य आहे खासगी कंपन्यांचंही आम्ही जॉब फेअर केले असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.

नवा ग्रीन फिल्ड महामार्ग मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या कामावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष आहे. त्यामुळे रखडलेला हा महामार्ग आता लवकरच पूर्ण होईल. त्याच्या जोडीलाच कोकणसाठी नवा महामार्ग अस्तित्वात येणार असून मुंबई ते सिंधुदुर्ग असा नवा ग्रीनफिल्ड महामार्ग होणार असल्याचे सांगून त्याचे डिपीआर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोकणसाठी नवे प्राधिकरण – आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील वाया जाणाऱ्या पाण्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच कोकणचा विकास जलदगतीने व्हावा यासाठी कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्राधिकरणामुळे कोकणच्या विकासाला अधिक चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

अनेक योजनांचा नागरिकांना लाभ – या कार्यक्रमात शासकीय योजनांचा अनेकांना लाभ मिळाला. कित्येकांना दाखले देण्यात आले अनेक दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. काही योजनांच्या लाभार्थ्यांना खास मार्गदर्शनही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. जवळपास १० हजार लाभार्थी या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून आले होते. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत आणि त्यांच्या सर्व टीमचे तसेच जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

Most Popular