24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeChiplunमहसूल विभागावर विविध प्रश्नांचा भडीमार - चिपळूण आमसभा

महसूल विभागावर विविध प्रश्नांचा भडीमार – चिपळूण आमसभा

शहरातही नाले, गटारांची कामे केल्याशिवाय सुशोभीकरणाची कामे हाती घेऊ नयेत.

येथील पंचायत समितीच्या आमसभेत महसूल विभागावर ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला. बोगस वाळू विक्री, रेशनकार्डची रखडलेली कामे, विलंबाने मिळणारे दाखले, डोंगरकटाईसाठीच्या मान्यतेबाबत लोकांनी संताप व्यक्त केला. यावर आमदार शेखर निकम यांनी सर्वच अधिकाऱ्यांना सामाजिक जाणिवेतून तत्काळ कामे करण्याची सूचना केली. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव करण्यात आला. आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली कापसाळ येथील माटे सभागृहात बुधवारी आमसभेचे आयोजन केले होते. महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करताना ग्रामस्थांनी सहा-सहा महिने रेशनकार्डची कामे मार्गी लागत नाहीत, गरजूंना रेशनचे धान्य मिळत नाही, पुरवठा विभागातील अधिकारी नागरिकांशी सौजन्याने वागत नाहीत, अशा तक्रारी केल्या.

यावर तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची हमी दिली. यानंतर अप्लेश मोरे यांनी घरकुलासाठी असलेल्या वाळूचा काळा बाजार सुरू असल्याचे सांगून कराड-पुणेपर्यंत ही वाळू विकली जाते. शासनाच्या वेबसाईटवर सर्वसामान्यांना वाळू मिळत नाही. वाळूमाफियांना मात्र वाळू सहजरीत्या उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट करत याविषयी चौकशी व्हावी व संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. वनविभागाच्या प्रश्नासंदर्भात संबंधितांच्या स्वतंत्र बैठका घेण्याच्या सूचना वनविभागाला केल्या. सहायक वनसरंक्षक प्रियांका लगड यांनी वनविभागातील प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांनी त्यांना निरुत्तर केले.

एसटीचे वाभाडे – गोवळकोट येथील रखडलेले पुनर्वसन आणि जिल्हा परिषद शाळेतील गैरसोयींचा पाढा वाचण्यात आला. एसटीच्या गळक्या बसेस, बिघडलेले वेळापत्रक, नादुरुस्त गाड्या आणि प्रवाशांशी असभ्य वर्तन या संदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे गटारे काढल्याशिवाय रस्त्यांची कामे हाती घेऊ नये, असे सुचविले. शहरातही नाले, गटारांची कामे केल्याशिवाय सुशोभीकरणाची कामे हाती घेऊ नयेत. शिवनदी किनाऱ्यावर होत असलेल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दाही उपस्थित केला.

RELATED ARTICLES

Most Popular