30.6 C
Ratnagiri
Sunday, April 14, 2024

अजय देवगणने ‘मैदान’मध्ये केला अप्रतिम अभिनय

2019 मध्ये अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची...

सिडकोला कोकणातून हद्दपार करणारच, खा. राऊतांचा निर्धार

गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव...

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे...
HomeRatnagiriशहरी भागात चालकाशिवाय गरागरा फिरणाऱ्या रिक्षाची चर्चा

शहरी भागात चालकाशिवाय गरागरा फिरणाऱ्या रिक्षाची चर्चा

रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करूनही रिक्षा थांबत नसल्याने हताश झालेला रिक्षाचालकाने अन्य रिक्षा चालकांना बोलावले. मात्र रिक्षा थांबवणार कशी. असा प्रश्न त्याच्यासमोर होता.

रत्नागिरी जेलरोड समोरील रस्त्यावर ड्रायव्हर शिवाय एक रिक्षा न थांबता आपोआपच गोलगोल फिरताना दिसत आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर काहीजणांनी काहीतरी भुताटकीचा प्रकार  आहे असे समजून तिथून काढता पाय घेतला. कारण विज्ञानात अजून एवढी प्रगती झालेली नाही कि,  ड्रायव्हर शिवाय गाडी फिरू शकते. त्यामुळे या ड्रायव्हर शिवाय फिरणाऱ्या रिक्षा बाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले.

ड्रायव्हरविना रिक्षा गरागरा फिरताना पाहून तेथे बघ्यांची गर्दी जबरदरस्त वाढली. सिग्नलच्या इथे जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यावर हा प्रसंग घडला. गाड्या थांबवून येथे रिक्षा पाहण्यात सारेजण दंग झाले होते. तर काही जण व्हिडिओ शूटिंग करण्यात दंग होते. रिक्षा चालक मात्र हैराण झाला होता. रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करूनही रिक्षा थांबत नसल्याने हताश झालेला रिक्षाचालकाने अन्य रिक्षा चालकांना बोलावले. मात्र रिक्षा थांबवणार कशी. असा प्रश्न त्याच्यासमोर होता.

बऱ्याच वेळानंतर त्याचे मित्रही तिथे आले त्यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही थांबत नव्हती. त्यानंतर कळलं की रिक्षाच स्टेरिंग लॉक झालं होतं. त्यामुळे रिक्षा एकाच जागेवर गरागरा फिरत होती. रिक्षा चालक बाहेर उडाला होता. त्यामुळे तो बचावला. परंतु पाहणाऱ्यांना हे माहीत नव्हते. असे दृश्य बघता कोणीही त्या रिक्षाजवळ थांबवण्यासाठी पुढे जाण्यास धजत नव्हते.

सर्व जण म्हणाले कि भूताटकी आहे. मात्र सतत सामाजिक कार्य करणारे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल समद सोलकर हे तेथून जात असताना त्यांनी ती रिक्षा अडवली व थांबवली. हे पाहताच इतर नागरिकही त्यांच्या मदतीला लगेचच धावत गेले. समद सोलकर यांच्या धाडसामुळे या रहदारीच्या रस्त्यावरील मोठा अनर्थ टळला. पण या गरागरा फिरणाऱ्या रिक्षाची चर्चा मात्र शहरभर व्हायरल झाली.

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे समद सोलकर यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समद सोलकर यांचा वाढदिवस आहे. या घटनेमुळे आजचा वाढदिवस हा त्यांच्या आणि समस्त रत्नागिरीकरांच्या चांगलाच लक्षात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular