27.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे खेडमधील राजकीय समीकरणे बदलणार

खेड तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणारी मोठी...
HomeRatnagiriमुंबईतून 'रो-रो बोट' साडेसात तासांत रत्नागिरीत...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

प्रिन्सेसमध्ये ६० गाड्या आणि ६२६ प्रवासी प्रवास करतील एवढी क्षमता आहे.

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. मुंबईहून सकाळी साडेसहा वाजता निघालेली ‘एमटूएम-प्रिन्सेस’ ही बोट मंगळवारी दुपारी २ वाजता रत्नागिरीतील जयगड बंदरावर पोहोचली. येथील शासकीय जेटीवर बोट व्यवस्थित उभी करणे, त्यामधून प्रवासी आणि वाहने सुखरूप उतरणे व चढणे याची चाचणी यशस्वी झाली. पावसाळी वातावरणामुळे समुद्र खवळलेला असल्याने हा प्रवास साडेसात तासांचा झाला. मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतुकीस राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर माझगाव भाऊचा धक्का येथून ‘एमटूएम-प्रिन्सेस’च्या माध्यमातून जलप्रवास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. सकाळी साडेसहा वाजता भाऊचा धक्का येथून मास्टर कॅ. मृत्युंजय यांच्या नेतृत्वाखाली ही बोट रत्नागिरीकडे रवाना झाली. त्यामध्ये रायगड व सिंधुदुर्गचे प्रादेशिक बंदर अधिकार कें. संजय उगलमुगले, सागरी अभियंता प्रसाद चव्हाण हे होते.

वादळी वातावरण, प्रवासाच्या विरुद्ध बाजूने वाहणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत दुपारी २ वाजता जयगड जेटीवर बोट दाखल झाली. रत्नागिरीचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, बंदर निरीक्षक सुनील पाटील यांच्या उपस्थितीत परीक्षण करण्यात आले. ‘एमटूएम-प्रिन्सेस’ला पाहण्यासाठी जयगडवासीयांनी गर्दी केली होती. ही बोट सुमारे अर्धा तास बंदरामध्ये उभी होती. त्यावेळी प्रवासी सुखरूप जेटीवर उतरतात का याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दुपारी अडीच वाजता ती विजयदुर्गकडे रवाना झाली. बुधवारी (ता. ३) सकाळी विजयदुर्गहून रो-रो फेरीबोट मुंबईकडे रवाना होईल. या चाचणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. गणेशोत्सवानंतर ही प्रवासी फेरीबोट सेवा केव्हापासून सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

….तर वेळापत्रकावर परिणाम – प्रिन्सेसमध्ये ६० गाड्या आणि ६२६ प्रवासी प्रवास करतील एवढी क्षमता आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम समुद्रातही दिसून येतो. अशा परिस्थितीत रो-रो बोटीचा वेग कमी राहणार आहे. ही बोट रत्नागिरीत तीन ते चार तासांत येणे अपेक्षित आहे. परंतु, वातावरण बिघडले तर प्रवासासाठी वेळ अधिक लागू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular