25.9 C
Ratnagiri
Friday, October 31, 2025

देशातील सरकार घटना पाळतच नाही आ. भास्कर जाधव यांची सडकून टीका

७४ व्या घटना दुरुस्तीनंतर ऑक्टो. आज देशामध्ये...

ताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर...

पूररेषेतील बांधकामांना दिलासा ! नगरविकास विभागाकडून समिती

पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याने नियम शिथिल करावेत,...
HomeKokanकोकण रेल्वेच्या रो-रो सेवेसाठी आता संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडीलाही थांबे

कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेसाठी आता संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडीलाही थांबे

गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली होती.

मुंबईतून कोकणात पोहोचण्यासाठी रस्तेमार्गे १० ते १३ तासांचा प्रवास करावा लागतो. तर रेल्वेने प्रवास करायचा तरीही तितकाच वेळ लागतो. मुंबई ते कोकण हे अंतर कमी कालावधीत गाठता यावे यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने रो-रो सेवा सुरू केली आहे. म्हणजेच प्रवाशांना थेट ट्रेनमधूनच आपले वाहन घेऊन जाता येणार आहे, गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेने या सेवेची घोषणा केली होती. मात्र या सेवेला प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाला होता त्यानंतर आता कोकण रेल्वेने रो-रो सेवेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी, संगमेश्वर आणि सावंतवाडी या ३ स्थानकांवरही थांबा मंजूर करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली होती. मात्र सेवेला खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं आता प्रशासनाने या मार्गावर आणखी ३ स्थानकांना थांबा मंजूर केला आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या काम ांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून ७,७०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वेने ३५ वा स्थापना दिन साजरा केला.

रो-रो सेवांना अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजना सुरू झाल्यापासून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हतो. रो-रो सेवांना अल्प प्रतिसाद मिळाला होता. कोलाड, नांदगाव रोड आणि वेर्णा येथून ७ प्रवाशांसह निघाली होती. अतिरिक्त थांबे नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद लाभत नव्हता. विशेषतः रत्नागिरी, सावंतवाडी येथील धांव्यांबाबत प्रश्न होते. त्यामुळे आता या ठिकाणी अतिरिक्त थांबे नियोजित करण्यात आले आहेत. रो-रो ट्रेनमधून चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे रॅम्प तयार केले जातील, असं कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी म्हटलं आहे.

कशी असेल रो-रो सेवा? – रो-रो ट्रेनमध्ये १० डब्यांचे वॅगन आणि दोन प्रवासी आहेत. कोलाड ते वेर्णा या मार्गासाठी एकावेळच्या प्रवासाचे तिकीट दर ७,८७५ आणि कोलाड-नांदगाव मार्गासाठी ५,४६० रुपये आहे.

किती असेल शुल्क ? – प्रति कार ७,८७५ (५ टक्के जीएसटी सह) बुकिंग करताना ४ हजार उर्वरित रक्कम ३,८७५ प्रस्थानाच्या दिवशी स्टेशनवर भरावी लागणार प्रति ट्रिप क्षमताः ४० कार (२० वॅगन प्रत्येकी २ कार) टीपः १६ कार बुक झाल्यानंतरच ट्रिप सुरू होईल अन्यथा शुल्क परत दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे कोणती? – आधार कार्ड (झेरॉक्स कॉपी), पॅन कार्ड, कार नोंदणी प्रमाणपत्र।

RELATED ARTICLES

Most Popular