27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeRatnagiriकोकण रेल्वेस्थानकांना जोडणारे रस्ते होणार काँक्रिटीकरण

कोकण रेल्वेस्थानकांना जोडणारे रस्ते होणार काँक्रिटीकरण

स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या बारा स्थानकांवर कार्यक्रम करण्यात येणार आला.

रेल्वेच्या प्रमुख १२ स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन आज होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर या पाच स्थानकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच व रायगडमधील दोन रेल्वेस्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी दिली. पुढील दहा वर्षे या रस्त्यांची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. वहाळकर यांनी रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि कोकण रेल्वे महामंडाळाची आर्थिक तोट्यातील स्थिती याचा विचार करून राज्य शासनाने यासाठी निधी द्यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्याची दखल मंत्री व कोकण रेल्वेत झालेल्या सामंजस्य करारानुसार कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख स्थानकांना

मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ६५ कोटींची तरतूद यापूर्वीच अर्थसंकल्पात केलेली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणसाठी खास बाब म्हणून हे काम केल्याने रेल्वे प्रवाशांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत, असे वहाळकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहातून आज सकाळी १०.३० ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा कार्यक्रम झाला. स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या बारा स्थानकांवर कार्यक्रम करण्यात येणार आला.

फोटोफीचरमधून मांडली होती व्यथा – रेल्वेस्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय स्थिती असल्याचे फोटोफीचर ‘सकाळ’ने काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिन वहाळकर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती आणि प्रवासी संघटनेचे राजू भाटलेकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निवेदन दिले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ दखल घेतली आणि काँक्रिटीकरण करण्याची ग्वाही दिली होती.

RELATED ARTICLES

Most Popular