28.5 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriपूर्वसूचना न देता खोदकाम, उपनगराध्यक्षांनी घेतले फैलावर

पूर्वसूचना न देता खोदकाम, उपनगराध्यक्षांनी घेतले फैलावर

रत्नागिरी मधील मध्यवर्ती भागामध्ये आलीमवाडी येथे नव्याने २ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता, परटवणे-आलीमवाडी रस्ता खोदकाम सुरु करायला सुरुवात केली.

शहर आधीपासूनच पाणी पाईपलाईन, वीज लाईन, खड्ड्यांची डागडुजी यासाठी सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच जनता त्रासातून जात असताना काहीही पूर्वकल्पना न देता केलेल्या खोदकामाबद्द्ल उपनगराध्यक्ष रोशन फाळके हे संतप्त झाले असून, हा माझा प्रभाग आहे, या प्रभागात काम वेळीच पूर्ण करा, अर्धवट काम सोडल्यास गाठ माझ्याशी आहे अशी तंबीच दिली आहे.

त्याचप्रमाणे ज्या प्रभागामध्ये काम करायचे असेल त्या प्रभागातील नगरसेवकांना त्या कामाची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. मी या प्रभागाचा नगरसेवक असून, मला या कामाबद्दल काहीच कल्पना दिली नाही. अचानक सुरु केलेल्या या कामाबद्दल रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी ठेकेदारासह कामगारांना चांगलेच फैलावर घेतले.

परटवणे भागातील रस्ता मोठ्या प्रमाणात खोदल्याने स्थानिक रहिवाशांना आपली वाहने इतरत्र आसपासच्या परिसरामध्ये अशोक नगर, खेडेकरवाडीच्या समोर वाहने उभी करावी लागल्याने. जेसीबी मध्यभागी लावून करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यातून वाट काढत जावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याबाबत उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या कानावर हि बातमी घातली.

त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून, खोदकाम करणाऱ्या ठेकेदारासह नगरपरिषद अधिकारी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेतले. व चाललेल्या कामाबद्दल विचारणा केली. तेंव्हा त्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत रविवारपर्यंत खोदाईचे काम संपवून रस्ता पूर्ववत करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे तत्काळ त्याचे डांबरीकरण त्वरित करून देऊ अशी हमी देखील दिली.

RELATED ARTICLES

Most Popular