27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiri'आरटीओ' वाहन कर्मचारी २४ पासून संपावर

‘आरटीओ’ वाहन कर्मचारी २४ पासून संपावर

प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने सेवा प्रवेश नियम प्रलंबित आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागातील भरतीबाबत आकृतिबंध मान्यतेचा शासन निर्णय होऊन दोन वर्षे होऊनही तो अमलात न आणल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. या आकृतिबंधाची पुर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी न केल्यास मोटार वाहन विभागातील कर्मचारी येत्या २४ सप्टेंबरपासून संप करणार आहेत, असा इशारा सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली. मोटर वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत आकृतिबंध मान्यतेचा निर्णय शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला; परंतु त्याची अमंलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या विभागात अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले होते. काही तांत्रिक बाबींचा बाऊ करून आकृतिबंधांच्या अंमलबजावणीबाबत टोलवाटोलवी केली जात आहे. यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मोटर वाहन विभागातील कर्माचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी न करताच त्याचा आधार घेऊन मात्र महसूल विभागस्तरावरील बदल्या करण्याचे सूत्र स्वीकारून राज्य शासनाने नुकत्याच महसूल स्तरावर बंदल्या केल्या.

आकृतिबंधानुसार पदांचे सेवाप्रवेश नियम मंत्रालयात निर्णयाविना पडून आहेत. प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने सेवा प्रवेश नियम प्रलंबित आहेत. कामकाजात एकसुत्रता नसल्याने कर्मचारी वर्गाला आणि विशेषतः जनतेला नाहक त्रास होत आहे. त्यामुळे मोटर वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular