27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeSindhudurgसावंतवाडीसाठी खा. नारायण राणेंची ना. दीपक केसरकरांना टाळी राजकारण धुमसतेय

सावंतवाडीसाठी खा. नारायण राणेंची ना. दीपक केसरकरांना टाळी राजकारण धुमसतेय

तेली यांच्या दिल्ली पर्यंत सुरु असलेल्या हालचाली पहाता केसरकरही सावध झाले आहेत.

मालवणी मुलखातील लोकांना नाटक आणि संगीता एवढंच राजकरण प्रिय किंबहुना कणकभर अधिकच निवडणूका आल्या की येथे एकच धमाल उडते. सावंतवाडीत वाडकर हा त्यांच्यासाठी जपून ठेवलेला शब्द. एरव्ही दशवतारात रंगणारा वाडकर आपल्या वागण्या बोलण्यातही त-हेचे अवतार धारण करणारा आढळतो. बोलण्यावागण्यात रसाळ फणसासारखा. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ग्रामस्थ आणि चाकरमानी भजन आणि आरतीसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे गेले काहो दिवस सुरु असलेला केसरकर विरुद्ध तेली यांचातील कलगीतुरा ऐकून गजाली छाटताना पहायला मिळत आहे.

राजन तेली यांची खरी गोची – राज्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपाशी संधान बांधल्यावर माजी आमदार राजन तेली यांची चांगलीच गोची झाली आहे. विधान सभेत आम दार म्हणून निवडून येण्याचे त्यांचे स्वप्न आहे. महायुतीतून केसरकर यांना उमेदवारी मिळाली तर आपलं भवितव्य काय? याची चिंता तेली यांना लागली आहे. काही महिन्यापूर्वी तेली यांनी दिल्लीत धाव घेऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपा नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भेटीचा एक फोटोही प्रसिद्ध झाला होता.

मालवणी माणसाला देणगी उपजतच – मालवणी माणसाला बुद्धीची देणगी उपजतच आहे. लाल मातीतून सोन्याच्या प्रज्ञेची माणसे येथे निर्माण झाली आहेत. राजकारणावर अभ्यास करण्याची परंपरा पूर्वी पासून लखलखखित ठेवली आहे. कुणाचे काय चुकले? कोण काय बोलतो. निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी कोण करेल? त्याला स्वपक्षातून छुपा पाठिंबा कसा मिळेल? कोण कधी दुसऱ्या पक्षात उडी मारेल यावर चर्चा करताना ऐकायला मिळत आहे. तेली आणि केसरकर यांचा वाद वाढत असताना दुसरी कडे राणे आणि केसरकर यांच्या मनोमिलनची चर्चा ऐकायला मिळत आहे.

राणे-केसरकर मनोमिलन – तेली यांच्या दिल्ली पर्यंत सुरु असलेल्या हालचाली पहाता केसरकरही सावध झाले आहेत. त्यांनी खासदार नारायण राणे यांच्याशी असलेले राजकीय वैर विसरून जवळ जाण्याचा प्रयत्न केला. राणे यानीही त्यांना टाळी दिल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत स्वपक्षाचे किरण सामंत हे इच्छुक असताना केसरकर यांनी एक खेळी केली आहे. त्यांनी एक वक्तव्य केले होत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ना. नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी देतील. त्यांना उमेदवारी मिळाली तर आनंद आहे. माझा पाठींबा आहे. असं वक्तव्य करून राणे यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. किरण तथा भैया सामंत यांना रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी मिळणार अस सांगणारे दीपक केसरकर अचानक भाजपचे नेते नारायण राणे यांना उमेदवारी मिळेल असं का म्हणाले होते ? हे मालवणी मुलखातील मंडळींनी तंतोतंत ओळखले असावे आणि त्यामुळे अवघ्या मालवणी मुलखात गजालींना पेव फुटले.

राजन तेलींचे काय होणार ? – केसरकर आणि, राणे हे लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र दिसले. हे अनेकांनी पाहिले. सावंतवाडी विधान संभा मतदार संघातून राणे यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. याचे श्रेयं केसरकर समर्थक घेत असले तरी राणे समर्थकांचीही ताकद मोठी आहे. २०१४ व २०१९ साली तेली यांनी केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळा तेली यांचा पराभव झाला. यावेळी तेली यांनी निवडणूक लढविली तर राणे यांनी युतीचा धर्म पाळत केसरकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर तेली यांचे काय होणार ? असा सवाल व्यक्त होत आहे.

बापूसाहेबांची आठवण – मुळातच सावंतवाडीला संस्थानाची राजस पार्श्वभूमी लाभलेली. इथल्या बापूसाहेब महाराजांची आठवणी आज शंभर वर्षानंतर लोक काढतात. महात्मा गांधीनी बापूसाहेबांच्या संस्थानाला ‘रामराज्य ‘म्हटले होते. एवढा न्याय बुद्धीने कारभार येथे चालायचा गाव समृद्ध होते. जनता सुखी होती. आजच्या राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे ? असा खुले आम सवाल ऐकायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular