29.4 C
Ratnagiri
Friday, April 19, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeInternationalरशियात आयएसआयएसच्या दहशतवाद्याला अटक, व्हिडीयो व्हायरल

रशियात आयएसआयएसच्या दहशतवाद्याला अटक, व्हिडीयो व्हायरल

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने प्रतिबंधित आयएसआयएसच्या सदस्य अझमोव माशाहोंटेला अटक केली आहे.

इस्लामिक स्टेटच्या फिदायनला सोमवारी रशियात अटक करण्यात आली. ही अटक रशियन सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. आत्मघातकी हल्लेखोर भारतात स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचा दावा एजन्सींनी केला आहे. त्यांचे लक्ष्य सत्ताधारी पक्षाचे नेते होते. वृत्तानुसार, रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने प्रतिबंधित आयएसआयएसच्या सदस्य अझमोव माशाहोंटेला अटक केली आहे. एफएसबीने दहशतवाद्याचा व्हिडिओही जारी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या धर्मगुरुंवरील आक्षेपार्ह टिपण्णीवरून अनेक इस्लामिक संघटनांनी विरोध दर्शवला होता.

२७ मे रोजी सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर टीका केली होती. हे प्रकरण गाजताच त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. ५७ मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने प्रथम या मुद्द्यावर विरोध केला आणि त्यानंतर काही अरब देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. याला उत्तर देताना भारत सरकारने म्हटले होते – आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो.

एफएसबीने सांगितले की, दहशतवादी अझमोव माशाहोंटे हा मूळचा मध्य आशियाई देशातील रहिवासी आहे. ISIS ने त्याला तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केले होते. प्रशिक्षणानंतर त्याला रशियाला पाठवण्यात आले. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी रशियाला सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये दहशतवादी भारताचा बदला घेण्याचे बोलत आहे. तो म्हणाला- मी तिथे हल्ला करणार होतो. तेथे प्रेषित मुहम्मद यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे त्यांचा बदल घेण्यासाठी भारतात त्या ठिकाणी काही घातपात घडवण्याची शक्यता त्याने वर्तवली.

RELATED ARTICLES

Most Popular