29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriएमआयडीसीमधील “त्या” जागेचा अखेर गुंता सुटणार, नव्या उद्योगाची शक्यता

एमआयडीसीमधील “त्या” जागेचा अखेर गुंता सुटणार, नव्या उद्योगाची शक्यता

स्थानिक आम. उदय सामंत यांची केंद्रात उद्योगमंत्री पदी वर्णी लागल्याने, रत्नागिरीला पुन्हा नवीन प्रकल्पाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात अथवा तालुक्यात म्हणा नवीन कोणताही प्रकल्प, उद्योग शासनाकडून सुरु करायचा म्हटल तर अनेक अडचणी निर्माण होतात आणि मग कोणताच नवीन काही प्रकल्प स्थापित होत नाही. मात्र स्थानिक आम. उदय सामंत यांची केंद्रात उद्योगमंत्री पदी वर्णी लागल्याने, रत्नागिरीला पुन्हा नवीन प्रकल्पाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

सन १९७१-७२ मध्ये एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीच्या अल्युमिनियम प्रकल्पासाठी रत्नागिरीतील ३०० शेतकऱ्यांची तब्बल १२०० एकर जमिन संपादित करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत जागेवर एमआयडीसीने बोजा लावला. १९८४ साली हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहणार होता. मात्र या प्रदुषणकारी प्रकल्पाला त्यावेळी तीव्र विरोध करण्यात आला. प्रकल्पाविरोधात अनेक मोर्चे, आंदोलने करण्यात आली. त्यामुळे जनप्रक्षोभामुळेच कंपनीला प्रकल्प थांबवावा लागला होता.

स्टरलाईट कंपनी न्यायालयात गेल्याने जागेचा गुंता कायम आहे. अनेक वेळा एमआयडीसीने कंपनीला जागा परत करण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. स्वत: कंपनी सुरु करा. अन्यथा जागा परत करा अशी सुचना एमआयडीसीने केली होती. प्रकल्पासाठी सर्वात कमी भावाने घेतलेली ही जमिन शेजाऱ्यांना अद्याप परत मिळालेली नाही. त्यामुळे मूळ जागा मालकांनी पुन्हा जागा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत आहेत.

मात्र राज्याच्या मंत्रीमंडळात स्थानिक आमदार उदय सामंत यांच्याकडे राज्याच्या उद्योग विभागाची धुरा आल्यानंतर पुन्हा एकदा  स्टरलाईट कंपनीच्या जागेवर कंपनी उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीकडून ती जागा पुन्हा एमआयडीसीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी नवी कंपनी उभारण्याची तयारी सुरु झाली आहे.

नवे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघातील स्टरलाईटची जागा गेली तब्बल ५० वर्ष पडून आहे. मात्र ना.सामंत यांनी सदर जागा एमआयडीसीकडे पुन्हा घेवून नवा प्रकल्प उभारण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular