25.9 C
Ratnagiri
Tuesday, March 19, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeSportsप्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या मुलाच्या कार्याने ओळखले जावे

प्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या मुलाच्या कार्याने ओळखले जावे

सचिनने कबूल केले की क्रिकेटरचा मुलगा असल्याने त्याच्यावर अतिरिक्त दबाव येतो.

अर्जुन तेंडुलकरने गोव्याविरुद्ध रणजी पदार्पण सामना खेळताना पहिल्या डावात १२० धावा करून वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिनने १९८८ मध्ये रणजी पदार्पणातही शतक झळकावले होते. आता त्याच्या मुलाच्या या यशावर मास्टर ब्लास्टरचे वक्तव्य आले आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

त्याने एका कार्यक्रमात त्याच्या पदार्पणातील शतक आणि वडील रमेश तेंडुलकर यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आणि म्हणाला की ‘मला अजूनही आठवते की माझ्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात माझ्या वडिलांना कोणीतरी ‘सचिनचे वडील’ म्हणून हाक मारत होते. मग माझ्या वडिलांच्या मित्राने त्यांना विचारले तुला कसे वाटते? तेव्हा तो म्हणाला होता की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाच्या कार्याने ओळखले जावे असे वाटते.’

सचिनने कबूल केले की क्रिकेटरचा मुलगा असल्याने त्याच्यावर अतिरिक्त दबाव येतो. अर्जुनची त्याच्याशी तुलना करू नये, असे आवाहनही त्यांनी यापूर्वी केले आहे. त्याच्यावर अतिरिक्त दबाव आणू नका. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर कधीही दबाव आणला नाही. त्याचवेळी अर्जुनला परफॉर्म करू द्या, असेही सचिनने मीडियाला सांगितले. त्याच्या कामगिरीनंतरच काही बोलणे योग्य ठरेल.

पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी माझे बोलणे झाले, असा खुलासा सचिनने केला. मी त्याला शतकासाठी खेळायला सांगितले. पहिल्या दिवसअखेर तो ४ धावांवर नाबाद राहिला. संघासाठी चांगली धावसंख्या किती असेल, असे त्याने विचारले होते. पहिल्या दिवशी नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना गोव्याने ५ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावा केल्या. मी त्याला सांगितले की किमान ३७५ स्कोअर चांगला होईल. मग अर्जुन म्हणाला कि तुम्ही नक्की सांगू शकता का? मग मी म्हणालो, हो तुला जाऊन शतक करावे लागेल. असे खेळाबद्दल बोलणे देखील अर्जुन आणि माझ्यात वरचेवर होत असते.

RELATED ARTICLES

Most Popular