21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriश्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

त्रिमीती प्रक्षेपण व्यवस्था या तारांगणात आहे. याच्या बांधकामास ११ कोटी ५८ लाख खर्चुन हे उभारण्यात आले आहे.

रत्नागिरीमध्ये काल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आगमन झाले. मुख्यमंत्री पदग्रहण केल्यावर ते प्रथमच रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. जागोजागो कार्यकर्त्यांची जय्यत तयारी दिसून येत होती. जिल्हा प्रशासनाने देखील सर्व विभागांमार्फत तयारी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. त्यातील विशेष म्हणजे रत्नागिरीत सांस्कृतिक आणि वैज्ञानिक केंद्र ठरणाऱ्या श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

माळनाका परिसरात असलेल्या या तारांगणाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, योगेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्रिमीती प्रक्षेपण व्यवस्था या तारांगणात आहे. याच्या बांधकामास ११ कोटी ५८ लाख खर्चुन हे उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी फित कापून आणि कोनशिलाचे अनावरण करुन याचे लोकार्पण केले. इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीने याची उभारणी केली आहे.  यात व्हिमिती व त्रिमीती प्रक्षेपणाची सोय आहे.

देशातील या स्वरुपाचे पाचवे डिजीटल तारांगण रत्नागिरीत तयार झाले आहे. याच्या स्थापत्य कामावर ५ कोटी ६८ लाख रुपये खर्च आला असून अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा व वातानुकूलीत सभागृह आणि प्रक्षेपण साहित्य यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च आला आहे. याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात ०१ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्चुन विज्ञान गॅलरी व ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करुन कला दालन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे रत्नागिरीच्या सौदर्यात चार चांद लागणार आहेत. आणि पर्यटनाचा ओघ अजूनच वाढणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular