रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप परीसर हा महावितरणच्या एम.आय.डी.सी. विभागाऐवजी शहर विभागाला जोडण्याच्या भाजपच्या मागणीला यश आले आहे.
एमआयडीसी विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची परीसरातील नागरिकांची तक्रार होती, त्यानुसार भाजपाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन, चर्चा करून मागणी केली होती. ही मागणी पूर्ण केल्याबद्दल भाजपाने महावितरणचे आभार मानले आहेत.
शहरातील प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा या भागातील कार्यकर्त्यांनी याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे प्रश्न मांडला.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेट देत जाब विचारला व या परिसरातील लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, हा परीसर रत्नागिरी शहर विभागाला जोडला जावा, अशी मागणी केली. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी याची तातडीने दखल घेतली आणि साळवी स्टॉप परीसर एमआयडीसी विभागातून काढून शहर युनिटला जोडण्यात आला. याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या सह शहराध्यक्ष राजेंद्र फाळके,शैलेश बेर्डे मंदार खंडकर, नितीन गांगण , सौ सायली बेर्डे, प्रसाद बाष्ठे, संजीव बने ,तुषार देसाई, निलेश आखाडे यांनी कार्यकारी अभियंता, इंजिनिअर श्री मकवाना यांची भेट घेत आभार मानले.
या केलेल्या कामाबद्दल प्रभागातील नागरिकांकडून सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.