27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeRatnagiriछत्रपती संभाजी महाराज स्मारक संग्रहालय व अभ्यासकेंद्रासाठी अखेर निधी मंजूर

छत्रपती संभाजी महाराज स्मारक संग्रहालय व अभ्यासकेंद्रासाठी अखेर निधी मंजूर

हा निधी तातडीने उपलब्ध व्हावा, अशी शिवप्रेमींची आणि ग्रामस्थांकडून सतत मागणी होती.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यात काही काळ छत्रपती संभाजी राजेंचे वास्तव्य होते. या पवित्र ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्य काळातील जीवनावर आधारित एक स्मारक संग्रहालय आणि अभ्यासकेंद्र उभारण्याचे काम मागील कित्येक काळापासून प्रस्तावित होते. परंतु, केवळ निधी अभावी हे काम रखडलेले होते. अखेर आम. शेखर निकमांच्या पाठपुराव्यामुळे निधीला मंजुरी मिळाली आहे.

आवार सुशोभिकरण, शिवकालीन वस्तू संग्रहित करून त्यांचे जतन करणे, इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, बंदिस्तीकरण,  महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या प्रसंगांचे सादरीकरण तसेच महाराजांच्या जीवनावरील लेखन साहित्य संग्रही करून ते अभ्यासकांसाठी उपलब्ध करणे,  नवीन बदललेल्या राष्ट्रीय महामार्गापासून जोडरस्ता बनवणे इत्यादि कामांची पूर्तता करणे या सर्वच कामासाठी निधीची आवश्यकता होती.

हा निधी तातडीने उपलब्ध व्हावा, अशी शिवप्रेमींची आणि ग्रामस्थांकडून सतत मागणी होती. त्यांच्या मागणीनुसार आमदार शेखर निकम यांनी यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपरावा करून प्रादेशिक पर्यटक विकास योजनेतर्गत ५  कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला. त्यातील पहिल्या टप्प्यातील दीड कोटीचा निधी वितरित केला गेला आहे.

कार्यतत्पर आमदार शेखर निकम हे हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी जीवाचे रान करायला देखील मागे पुढे बघत नाहीत. त्यामुळे हा निधी शासनाकडून लवकर मिळावा यासाठी सुरु असलेल्या धडपडीला अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे शिवप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच दुर्लक्षित राहिलेल्या संभाजी राजे स्मारक, अभ्यासकेंद्र आणि संग्रहालयाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आम. निकम यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular