30 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeRajapurवायरमन शॉक लागून मृत्यू प्रकरणी ८ जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वायरमन शॉक लागून मृत्यू प्रकरणी ८ जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता ज्योती नवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी ओणी येथील ८ जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ओणी येथे वायरमनला शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर महावितरणच्या कनिष्ठ अभियंता ज्योती नवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी ओणी येथील ८ जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला शाखा अभियंता ज्योती नवाळे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन राजापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता ज्योती नवाळे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि.२७ मार्च रोजी महावितरणचे कर्मचारी वायरमन प्रकाश बाबू गमरे यांचा ओणी पेट्रोलपंपासमोरील रोड पलिकडे असलेल्या डी.पी.वरती शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अभियंता श्रीम. नवाळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत आपल्या वरिष्ठांसह राजापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

प्रकाश गमरे ज्या डीपीवर शॉक लागून चिकटले होते, त्या डीपीच्या खालील बाजूस जमिनीवरून धूर येत असल्याने ओणी फिडरचा वीज पुरवठा चालू आहे का?  ते तपासण्यासाठी त्या महावितरण उपकेंद्र ओणी येथे गेल्या. दरम्यान श्रीम. नवाळे उपकेंद्रावर असताना सुमारे ३५ ते ४० लोकांचा जमाव त्या ठिकाणी आला व तिकडे तुमचा माणूस लटकला आहे व तुम्ही इथे काय करता? असा सवाल करत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे नवाळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.

घटनास्थळी जमलेल्या लोकांनी घेराव घातला पुन्हा जाब विचारायला सुरूवात केली. आम्ही सांगतो तसाच जबाब पोलिसांना द्यायचा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी तेथे असलेले महावितरणचे अधिकारी सौ. नेहा आखाडे, योगेश ठाकरे, संदीप बंडगर आदी उपस्थित होते. यामध्ये राजू पवार, संतोष रायकर, सूर्यकांत सुतार, संजय लिंगायत, नीलेश खातू, सतीश पवार, सोनाली रायकर यांच्यासह अन्य एका अज्ञाताचा समावेश आहे. या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular