28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeEntertainmentराख मराठी चित्रपटासाठी “या” अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

राख मराठी चित्रपटासाठी “या” अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

राख’’मधील माझे कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असल्यामुळे यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही आहे.

कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ मध्ये चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीप पाठकने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. संदीपने ‘राख’ या मराठी चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीप सोबत अमेरिकेचा डोनॅटो डि’लुका आणि नेदरलँडचा डिर्क मोहर हे दोन तगडे अभिनेत्यांची टक्कर होती. परन्तु, संदीपने या दोघांना पीछेहाट देत हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवले.

या सायलेंट मुव्हीचे दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले आहे. या चित्रपटात कोणत्याही संवादाशिवाय  संदीपने साकारलेल्या भूमिकेचे खूपच कौतुक करण्यात आले आहे. वऱ्हाड निघालंय लंडनलाच्या माध्यमातून विविध देशांमधील नाट्यरसिकांच्या मनात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या संदीपला मिळालेला हा पुरस्कार सर्वार्थाने त्याने आजवर केलेल्या मेहनतीची पोचपावती आहे. एकीकडे विनोदी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना पोट धरून हसवताना संदीपने दुसरीकडे साकारलेली हि धीरगंभीर भूमिका त्यातील संवेदनशील अभिनेत्याचंही दर्शन या चित्रपटात घडवले आहे. नेहमीच संदीपने दोन भिन्न टोकांच्या व्यक्तिरेखांचा अचूक ताळमेळ साधण्याचे काम केले आहे.

बऱ्याच कलाकारांनी आजवर आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचेही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकारण्याचे काम केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये कोणतीही व्यक्तिरेखेमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या संदीप पाठकने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपले नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संदीप म्हणाला की, जरी हा पुरस्कार मला मिळाला असला, तरी तो मुळीच माझा एकट्याचा नाही. ‘राख’ च्या संपूर्ण टिमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. ’राख’’मधील माझे कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असल्यामुळे यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच असल्याचंही संदीप म्हणाला.

RELATED ARTICLES

Most Popular