26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeMaharashtraतर...... हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा, संजय राऊतांचा थेट आरोप

तर…… हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा, संजय राऊतांचा थेट आरोप

नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेतून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं होतं. या निर्णयांना स्थगिती का देण्यात आली ? हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हे तिन्ही निर्णय फिरवले असतील आणि खरं असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

राजकीय, आर्थिक , बुलेट ट्रेन, आरेचा विषय आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?, निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच दि.बा. पाटील याचं नाव देण्याचा निर्णय हा लोकभावनेचा आदर म्हणून निर्णय घेतला होता. पण हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार असल्याने केवळ स्थगिती, स्थगिती, स्थगिती असं शिंदे भाजप सरकारचं सुरु आहे, अशी बोचरी टीका देखील संजय राऊत यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी शिवसेनेचा मालक आहे का, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. लाखो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राण देण्यासाठी तयार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणं याला शिवसेना संपवणं म्हणत असेल तर निष्ठेच्या व्याख्या बदलाव्या लागतील. ज्यांना शिवसेना संपवायची होती ते भाजपसोबत गेले आहेत. पण एक दिवस शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणं झेपावेल आणि राज्याच्या सत्तेत येईल.

RELATED ARTICLES

Most Popular