28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम पुन्हा जोमाने सुरु…

चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम...

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...
HomeMaharashtraसॅटेलाइट टॅगिंग केलेल्या प्रथमाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, वेळासपासून ३३० किमी अंतर पार

सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या प्रथमाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, वेळासपासून ३३० किमी अंतर पार

सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी प्रथमा ने गुजरातचा किनारा गाठला आहे.

मंडणगड, वेळास, दापोली, आंजर्ले, गुहागर या किनार्‍यांवर अंडी घालून समुद्रात जाणार्‍या कासवांना टॅगिंग केले असून, त्यांना नावेही देण्यात दिली आहेत. यातील प्रथमा नामक कासवाचा प्रवास सतत पुढे सुरूच असून,  ते गुजरातच्या किनार्‍यावर पोहोचले आहेत. आतापर्यंत वेळासपासून प्रथमाने ३३० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. ते सध्या दीव किनार्‍यापासून ६५ किमी अंतरावर आहे.

समुद्री कासवांबद्दल अभ्यास आणि माहिती जाणून घेण्यासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी प्रथमा ने गुजरातचा किनारा गाठला आहे. या कासवाने सर्वाधिक ३३० किलोमीटरचा प्रवास केला आहे;  तर सावनी आणि वनश्री यांनी रेवा कासवाच्या दिशेने आणखी दक्षिणेकडे म्हणजेच कर्नाटकच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. रेवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून, ते कारवारपासून ४०, तर मंगळूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. त्यातील केवळ लक्ष्मी हे कासव महिन्याच्या कालावधीतच संपर्काबाहेर गेले;  तर उर्वरित चार कासवांच्या सद्य स्थितीवर आणि ठिकाणावर त्यांच्या प्रवासावर कांदळवन विभागाचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे लक्ष ठेवून आहेत.

कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करून अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानकडून पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांत पाच कासवे सोडण्यात आली होती. त्यातील सावनी हे सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुमारे ९० किमी सरळ रेषेत प्रवास करत आहे. रेवा कासवाचा प्रवास हा दक्षिणेकडे सुरु असून ती गोवा ओलांडून कर्नाटकच्या पाण्यामध्ये प्रवास करत आहे. सध्या कर्नाटकातील कारवारपासून ४० किमी अंतरावर आहे. वनश्री किनार्‍यानेच दक्षिणेकडे जात असून, ती सध्या आंबोळगड किनार्‍यापासून सुमारे २५ किमी सरळ रेषेत आहे. कासवांचा हा सुरु असलेला प्रवास केवळ यंत्रणेमुळे कळू शकत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular