21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक बिघडले

कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक बिघडले

कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत आहेत.

कोकणरेल्वे मार्गावर गुरूवारी ७ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. नागपूर-मडगाव स्पेशल तब्बल ५ तास विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अन्य ६ रेल्वेगाड्याही उशिराने रवाना झाल्याने प्रवासी खोळंबले. उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत आहेत. एकीकडे त्या-त्या रेल्वेस्थानकांत दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची दमछाक होत असताना दुसरीकडे विलंबाच्या प्रवासाची भर पडत आहे. ०११३९ क्रमांकाची नागपूर-मडगांव स्पेशल तब्बल ५ तास १० मिनिटे विलंबाने धावल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

ही स्पेशल उशिराने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. १०१०३ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे, तर १०१०६ क्रमांकाची दिवा सावंतवाडी पॅसेंजर १ तास ३५ मिनिटे उशिराने रवाना झाली. १२२२४ क्रमांकाची एर्नाकुलम – एलटीटी दुरांतो एक्सप्रेस २ तास ३० मिनिटे विलंबाने रवाना झाली. यापाठोपाठच कोच्युवेली-एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस १ तास ५० मिनिटे तर १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १ तास विलंबाने धावली. १२२१८ क्रमांकाच्या केरला संपर्क क्रांती एक्सप्रेसही १ तास उशिरा.

RELATED ARTICLES

Most Popular