29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

फुटबॉलचा सर्वात मोठा स्टार पुढच्या वर्षी भारतात येणार…

संपूर्ण जगाला फुटबॉलचे वेड लागले आहे. भारतातही...

गणपतीपुळे किनाऱ्यावरील ‘त्या’ भिंतींना धोका

तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून...

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला...
HomeRatnagiri'ते' अपरात्री आले, अन् मिठ्यापण मारून गेले! बांधावरून चालताना ढरसकन चिखलात रगडले!

‘ते’ अपरात्री आले, अन् मिठ्यापण मारून गेले! बांधावरून चालताना ढरसकन चिखलात रगडले!

युवा मतदारांना पार्थ्यांबरोबरच जे मागाल ते देण्याचे आश्वासनही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांकडून दिले गेले.

विधानसभा निवडणूकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपला, आणि रात्रीनंतर गुप्त प्रचाराला वेग आला. गाठीभेटी, फोनाफोनी यातून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अख्खी रात्र जागवली. यामुळे दिवसभर भातकापणीत असलेल्या शेतकरी वर्गाची सुखाची झोपही हिरावली गेली. त्यामुळे रात्री-अपरात्री प्रचारासाठी आलेल्या या कार्यकर्त्यावर शेतकरी वर्गाने जोरदार ताशेरे ओढले. ‘अहो, यांना काम ना धंदे, ते रात्री-अपरात्री दारावर आले. दार ठकठक केले, दार उघडताच मंडळी थेट घरात घुसली, आणि गोडगोड बोलू लागली. कसेबसे करून त्यांचा निरोप घेतला, तेव्हा ती मंडळी गळाभेटी घेऊन, मिठ्या मारून बाहेर पडली’, अशी उद्दविग्न अवस्था काही गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. यानिमित्ताने गावपाड्यातील प्रचाराच्या अनेक सुरस कथा समोर आल्या.

गोंधळात गोंधळ – विधानसभा निवडणूकीचा प्रचार यंदा जोरदार रंगला. प्रचारसभा, रॅल्या, बैठका यांचे घमासान सुरू होते. विशेष म्हणजे युत्या-आघाड्या असतानाही या युती, आघाडीतीलच उमेदवार अनेक ठिकाणी आमने-सामने राहिले होते. कोण कुठचा उमेदवार, आणि कोणाला कोणाचा पाठिंबा, यावरून कायकर्त्यांचा इतका गोंधळ उडत होता, तेथे सर्वसामान्य मतदारांची कथा काय वर्णावी..?

कार्यर्त्यांनी रात्र जागवली – सोमवारी संध्याकाळी प्रचार संपला, आणि गुप्त प्रचाराला सुर्य म विळताच रंगत आली. हा गुप्त प्रचार थेट न होता, भेटीगाठी-फोनाफोनी यातून रंगणारा. सोमवारच्या रात्रीही तो असाच रंगला. शेवटची संधी न सोडता आपला गाव, आपली वाडी अक्षरशः पिंजून काढली, आणि रात्रभर प्रत्येक उंबरठा ओलांडला. याचा नाहक त्रास दिवसभर भातकापणी आणि रात्री लवकर झोपलेल्या शेतकरी वर्गाला बसला.

मिठयापण मारल्या! – दमले-भागलेले शेतकरी सुखाने चार घास तोंडात टाकून निद्रादेवीच्या अधीन झाले. इतक्यात दारावर ठकठक झाली. आता अशा मध्यरातीला कोण दारावर आलं, म्हणून सारे काळजीने उठले. पाहतो, तर बाहेर गळ्यात पट्टे घालून, डोक्यावर टोप्या, हातात कागपपत्र घेऊन गावची कार्यकर्ती मंडळी हजर. त्यांनी बोलायचीही उसंत घेतली नाही. मंडळी तडक घरात घुसली. गोडगोड बोलली, गळ्यात गळे घातले. मिठ्यापण मारल्या, आणि निघून गेली. हा सारा प्रकार पाहून शेतकरी वर्ग अक्षरशः बुचकळ्यात पडला. शेतकरी वर्ग दिवसभर भातकापणीत रमलेला असल्याने दिवसभर कुणीच घरी भेटेना, त्यामुळे कार्यकत्यांनी रात्रीचा दिवस करायचा ठरवून रात्रीचा प्रचार रंगवला खरा, मात्र त्याचा त्रास गावकऱ्यांना झाला.

चिखलात बरबटली – ही कार्यकर्ती मंडळी तरणीबांड, शहरातील, शिकलेली, सुटा-बुटातली. त्यांच्या शेतावरच्या प्रचाराची गंमतही एका शेतकऱ्याने ऐकविली. प्रचाराच्या काळात दिवसभर सारा शेतकरी वर्ग शेताच्या बांधावर भातकापणीत रम लेला, त्यामुळे त्याची भेट घेऊन उम `दवाराचे गोडवे गाण्यासाठी या मंडळींना बांधावर जाणे भाग होते, त्यासाठी ही मंडळी गेली. मात्र बांधावरज्या शेणा-मातीच्या चिखलात बरबरटून गेली.

घामानं डबडबली – चालणे म्हणजे काय ते गाड्या सुसाट सोडणाऱ्या प्रचारकांना माहित नाही. त्यामुळी ही मंडळी घामानं अक्षरशः डबडबली होती, तर काही पक्की वाट नसल्ल्याने धडपडून खाली कोसळली. अशा ढेपाळलेल्या मंडळींना मतदान करून, ती काय बरे या शेतकऱ्यांचे कल्याण करणार..?. असा सवाल काही शेतकऱ्यांनी यानिमि त्ताने केला.

गावजेवणावळी रंगल्या – कोणतीही निवडणूक म्हटली की गावजेवण आले. ही प्रथाच आता कोकणात अनेक भागात विशेषतः तळकोकणात रुढ झालेली आहे. राजकीय पक्ष आपले मतदार फुटू नयेत अथवा नव्या मतदारांना आपल्या बाजुन आकृष्ट करण्यासाठी गावजेवणावळीच्या फासि बेत आखला जात आहे. दररोज शेकडो किलो म टण, चिकन बिर्याणीचा सुग्रास सुवास गावागावातः दरळवताना दिसत होता. रात्री ७ नंतर निवडणूक यंत्रणेची नजर चुकवून या गावजेवणावळी होतानाचे चित्र सर्रासपणे दिसत होता.

जोरदार ताव मारला! – या जेवणावळीबरोबरच इच्छुकांसाठी घसा ओला करण्यासाठी जलपानाचीही सर्व सुविधा उपलब्ध करुन दिली जात होती. देशी, विदेशीची चवही आता मतदारांना हवीहवीशी वाटू लागली आहे. आताच संधी आहे. मिळतय तोपर्यंत घ्या खावून या भूमिकेतून मतदारही सर्वच राजकीय पक्षांच्या जेवणावळीवर ताव मारतानां दिसत होते.

अनेक आश्वासने – सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कुठे पार्टी आहे याचे संकेत दिले जात होते. योग्य ठिकाणी येण्याचे आवतणंच या युवा मतदारांना दिले होते. रात्रीच्या सुमारास केवळ पार्टी मिळते यांच भूमिकेतून युवा मतदार सुसाट गाड्या मारत पाटर्यांचा आनंद लुटताना दिसत होते. या युवा मतदारांना पार्थ्यांबरोबरच जे मागाल ते देण्याचे आश्वासनही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांकडून दिले गेले, मग त्यात विविध स्पर्धा भरविण्यासाठी बक्षिसांची रक्कम, ट्रॉफी देण्याचे, अनेकांना बेंजो, ढोल वादनासाठी साहित्य देण्याचे आश्वासनही दिले गेले.

RELATED ARTICLES

Most Popular