24 C
Ratnagiri
Wednesday, March 26, 2025

निधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट…

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

‘ते’ कंत्राटी शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४५४ कंत्राटी शिक्षकांना...

मंजूर एमआरआय मशीन अडकले कुठे ? सिव्हिल-वैद्यकीय महाविद्यालयात समन्वयाचा अभाव

जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोट्यवधीचे अत्याधुनिक एमआरआय मशीन...
HomeSportsभारतीय हॉकी संघातील खेळाडूंची निवड, पाठक, करकेरा श्रीजेशचे उत्तराधिकारी

भारतीय हॉकी संघातील खेळाडूंची निवड, पाठक, करकेरा श्रीजेशचे उत्तराधिकारी

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावले.

अठरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पी. आर. श्रीजेश याने पॅरिस ऑलिंपिकनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघातील गोलरक्षकाची जागा रिकामी झाली. आता त्याच्याऐवजी कोण, असा प्रश्न याप्रसंगी निर्माण झाला. याचदरम्यान आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकासाठी बुधवारी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. क्रिशन बहादूर पाठक व सूरज करकेरा या गोलरक्षकांची या संघात निवड करण्यात आली आहे. चीनमध्ये होत असलेली ही स्पर्धा ८ ते १७ सप्टेंबर यादरम्यान रंगणार आहे. पी. आर. श्रीजेश याचे भारतीय हॉकी संघात स्थान कायम असल्यामुळे क्रिशन बहादूर पाठक याला राखीव म्हणूनच बसावे लागत होते.

पॅरिस ऑलिंपिकमध्येही तो राखीव गोलरक्षक म्हणून कायम राहिला. आता मात्र पाठक याला भारताच्या मुख्य संघात स्थान मिळणार, हे निश्चित आहे. करकेरा याला राखीव गोलरक्षक म्हणून संघात रहावे लागणार आहे. भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावले. भारतीय हॉकी संघाचे ऑलिंपिकमधील हे सलग दुसरे ब्राँझपदक ठरले. या पदकविजेत्या संघातील १० खेळाडू आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकासाठी निवडण्यात आलेल्या संघात कायम आहेत. हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, शमशेर सिंग व गुर्जत सिंग या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

संघात तीन ड्रॅगफ्लिकर – भारतीय हॉकी संघामध्ये तीन ड्रॅगफ्लिकर आहेत. कर्णधार हरमनप्रीत सिंग याने ऑलिंपिकमध्ये ड्रॅगफ्लिकर म्हणून जबरदस्त कामगिरी केली. त्याच्यासह आता जुगराज सिंग व अरायजीत सिंग हुंदल या दोन ड्रॅगफ्लिकरला संघात संधी देण्यात आली आहे. हार्दिक सिंगच्या अनुपस्थितीत विवेक सागर प्रसाद याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय व सुमीत यांच्याकडे बचावाची जबाबदारी असणार आहे. राजकुमार पाल, निलकांता शर्मा, मनप्रीत सिंग, मोहम्मद राहील यांना मधल्या फळीची जबाबदारी पार पाडावी लागेल.

भारतीय पुरुष हॉकी संघ : क्रिशन बहादूर पाठक, सूरज करकेरा.

बचावपटू : जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमीत. मधली फळी : राजकुमार पाल, निलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद राहील मौसीन. आक्रमकपटू अभिषेक, सुखजीत सिंग, अरायजीत सिंग हुंदल, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग.

RELATED ARTICLES

Most Popular