26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeChiplunचिवेलीत 'सेल्फी विथ खड्डा' स्पर्धा

चिवेलीत ‘सेल्फी विथ खड्डा’ स्पर्धा

रस्त्याला मोठ्या प्रमाणात गेलेले तडे व खड्डे ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत.

चिवेली ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलने केल्यानंतर कौंढरताम्हाणे ते चिवेली लोणारी बंदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले; मात्र या रस्त्यावर पावसाळ्यात सातत्याने खड्डे पडतात. संबंधित विभागास निवेदन देऊनही फरक पडत नाही. त्यामुळे चिवेली सरपंचांनी नामी शक्कल लढवत अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मार्गावर चिवेली ग्रामपंचायत हद्दीत सेल्फी विथ खड्डा स्पर्धा घेत संबंधित .. विभागास जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धेची माहिती देताना सरपंच योगेश शिर्के म्हणाले, निर्मल ग्रामपंचायत चिवेली कार्यक्षेत्रातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०२०-२०२१ योजनेअंतर्गत सुमारे ४.५० कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था पहिल्याच पावसाळ्यात झाली.

वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर समजुतीच्या भावनेने काम करत होते; परंतु संबंधित ठेकेदाराची रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ऑक्टोबर २०२५ पर्यंत असून रस्त्याची आर्युमर्यादा चिरंतर राहील, असे वाटत नाही. ग्रामपंचायतीच्यावतीने या रस्त्यामधील नादुरुस्त भाग, वाढलेली दुतर्फा झाडी, दिशादर्शक फलक, वाडीचे नामनिर्देशक फलक, साईटपट्टीसाठी टाकलेले मातीचे ढिगारे, गटारांमध्ये असलेले दगड आणि रस्त्याला मोठ्या प्रमाणात गेलेले तडे व खड्डे ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

या संपूर्ण रस्त्यांमधील एकूण असणाऱ्या खड्ड्यांची संख्या, सेल्फी विथ खड्डा तसेच नादुरुस्त असणारा रस्त्याचा भाग विथ सेल्फी अशा बाबी ग्रामपंचायतीस निदर्शनास आणल्यास मी सरपंच या नात्याने माझ्या मानधनातून ग्रामस्थांसाठी स्पर्धा आयोजित करत आहे. विजेत्याला योग्य ते बक्षिस व गावातील जबाबदार व जागृत व्यक्तिमत्त्व अशा नावाने सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येईल. या मार्गावर पावसाळ्याच्या कालावधीत दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसात येथे दरडी कोसळण्यास सुरवात झाली. गुरूवारी सकाळी भलेमोठे दरड रस्त्यावर आले होते. सुदैवाने, त्या वेळी अनुचित प्रकार घडला नसल्याचे सरपंच शिर्के यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular