26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRajapurबिबट्याचा बंदोबस्त करा राजापुरात रास्तारोको

बिबट्याचा बंदोबस्त करा राजापुरात रास्तारोको

गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे.

तालुक्यातील पन्हाळे, गुंजवणे, तळगांव, मोसम, कोंड्ये परिसरात बिबट्याचा मुक्त संचार कायमस्वरूपी सुरू असून अनेक पाळीव जनावरे बिबट्याने शिकार झाली आहेत. याबाबत वनविभागाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या विरोधात आता २८ नोव्हेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन माहितीसाठी वनविभागासह महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी उबाठा शिवसेना जिल्हा समन्वयक दिनेश जैतापकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, नरेश दुधवडकर, पांड्या काझी आदी उपस्थित होते.

तालुक्यातील पन्हाळे, गुंजवणे, तळगांव, मोसम, कोंड्ये गावांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. या पंचक्रोशी गावात शेळ्या, बकरे, गाई-बैल, कुत्रे, मांजरे इत्यादी पाळीव जनावरांवर बिबट्या दिवसाढवळ्या रस्त्यावर हल्ला करुन त्यांना मारत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा नाईलाज झाला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी राजापूर वन निरिक्षक, अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी वेळोवेळी मागणी केली, मात्र पिंजरा न लावता किंवा इतर कोणतीही उपाययोजना न करता राजापूर वनविभाग टाळाटाळ करत आहे असा स्थांचा आक्षेप आहे.

ग्रामस्थांच्या अती आग्रहास्तव दोन दिवस कॅमेरे लावले जातात मात्र ते कॅमेरे चालू आहेत. का बंद आहे ते त्यांनाच माहित, अशी शंकाही ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे उपस्थित केली आहे. पाळीव जनावरांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याने जर का माणसांवर हल्ला केला तर त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तत्काळ या निवेदनाची दखल घेवून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी: मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडतील असा इशारा ग्राम स्थांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular