27 फेब्रुवारी रोजी ओणी, ता. राजापूर येथे कोकणबाग अॕग्रोटुरीझम शेतकरी कंपनी व जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषि-विभाग, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित रायपाटण येथील नोंदणीकृत कोकणबाग या शेतकरी कंपनीतर्फे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ओणी येथील गजानन मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कृषि-विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
कोविड 19 च्या नियमांचे पालन करुन या मेळाव्याचे आयोजन प्रशासनाची परवानगी घेऊन होणार आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. तानाजी चोरगे यांची, तसेच प्रमुख मार्गदर्शक व बँकेचे संचालक यांचेसह विविध निमंत्रीत मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यासाठी असणार आहे. लवकरच या मेळाव्यासाठी राजापूर व लांजा तालुक्यातील जास्तीतजास्त प्रगतीशील शेतकरी व बागायतदार यांचेशी विविध माध्यमांतून निमंत्रणासाठी संपर्क साधला जाणार आहे.
कोकणातील आंबा, काजू तसेच कोकम, नारळ बागायतदार यांना फलोत्पादनाच्या माध्यमातून प्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादने यासाठी या मेळाव्यात तज्ञ व्यक्तिमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे कोकणबाग अॕग्रोटुरीझम या शेतकरी उत्पादक कंपनीकडून गेली दिडवर्षे विविध प्रकारच्या शेती उत्पादनांचा व्यापार सुरू आहे.
तालुक्यातील तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांना कोकणबाग कंपनीच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ मिळावी म्हणून कंपनी कार्यरत राहणार आहे या मेळाव्यातून उपस्थित फळ बागायतदारांना, शेतकरी व बचतगट यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जाणार आहे यासाठी मेळाव्याला जास्तीत जास्त बागायतदार आणि शेतकरी, बचतगट, प्रगतीशील महिला शेतकरी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकण भाग कंपनीच्या संचालक श्री महेश पळसुले देसाई यांनी तील सहभागासाठी फोन नंबर 8275727710 श्री. दिपक पवार (संचालक) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.