अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि ४३ वर्षाची असून ती आपल्या अभिनय बरोबर तिच्या उत्तम फिगर साठी सुपरिचित आहे. शिल्पाच्या या फिटनेस चे सर्व श्रेय ती फक्त योग साधनेला देते. आपल्या फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी ती कायम योगाचा आधार घेताना दिसते. आपल्या चाहत्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी तिने सोशल मिडीयावर विविध विडीयो शेअर केलेले दिसतात. आपल्या शरीराचा आकार टिकवून ठेवण्यासाठी शिल्पा अनेक प्रकारची योगासने करते. पोटाची चरबी घटवण्यासाठी आणि स्वत:ला स्लिम ठेवण्यासाठी तिला धनुरासन आणि भुजंगासन करायला आवडते. कमरेचे फॅट कमी करण्यासाठी चक्रासन करणे तिच्या नियमित व्यायामाचा भाग आहे. याशिवाय तणाव दूर करणे व स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी ती ध्यानधारणाही रोज करते.
आपल्या चाहत्यांना ती नियमितपणे योगासने करण्याचा सल्ला अवश्य देते. शिल्पाचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यायामाचा किंवा योगासनाचा पूर्ण लाभ त्याच्यासोबत योग्य आहार घेतल्याने मिळतो. त्यामुळेच शिल्पा दिनचर्येत पौष्टिक आहाराचा समावेश करते. दिवसाची सुरुवात ती गरम पाणी व लिंबासोबत करते. एका दिवसात ती ८ ते १० ग्लास पाणी अवश्य पिते, जेणेकरून व्यायामानंतरही शरीर हायड्रेट राहू शकेल. फिटनेससाठी योगासनांशिवाय डान्सिंग, सायकलिंग आणि स्विमिंग करणे देखील शिल्पाला खूप आवडते. वयाची चार दशके पार केल्यानंतरही आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे.
शिल्पाच्या मते, तिच्या फिटनेसमध्ये योगासनांचा फार मोठा वाटा आहे. ती योगासनांबाबत जागरूक असून तिने आपली योगा सीडी देखील लाँच केली आहे. ती म्हणते, योगामुळे शरीराची चरबी घटतेच, पण यामुळे व्यक्तीचा अहंकार आणि भीतीही दूर होते. शिल्पाने तिच्या डेली वर्कआउट बद्दल सुद्धा माहिती देताना सांगितले कि, इंस्टाग्राम वर ती नेहमीच डेली वर्कआउटचे फोटो आणि विडीयो शेअर करत असते. योग केल्यामुळे मसल्स मजबूत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यां पासून सुटका होण्यास मदत होते. त्याच बरोबर आपल पोट आणि ओटीपोटाचा भाग टोन होण्यास मदत होते. शरीरातील सर्व प्रकारच्या वेदना दूर करण्यासाठी योगाचा फार उपयोग होतो. योग बरोबरच ध्यान साधना केल्याने मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे निरीगी आरोग्यासाठी जीवनात योगासनांची साथ असणे अत्यावश्यक आहे.