27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriस्थानिक लोककलावंताना मदतीचा हात

स्थानिक लोककलावंताना मदतीचा हात

कोकणामध्ये अनेक लोककला उदयास आलेल्या आहेत. आणि बरीच कुटुंबे अजूनही त्या लोककला जपताना दिसत आहेत. कोरोनामुळे अशी असंख्य कुटुंब आहेत ज्यांची उपजीविका फक्त यावरच अवलंबून आहे. त्यामुळे अशा कुटुंबांचे उदरनिर्वाह चालणार कसे ! त्यामुळे अशा अनेक कुटुंबांना रत्नागिरीतील पत्रकार बांधवानी मदतीचा हात दिला आहे.

रत्नागिरीतील आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार आणि मित्र तसेच पल्लवी फाउंडेशनच्या विद्यमाने लोक कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या या काळामध्ये पत्रकारांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी लोक कलावंतांना मदत करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे आणि लोक कलावंतांना यामुळे मिळालेलं प्रोत्साहन भविष्यात उपयोगी पडू शकत. असे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी केले.

कोकणची खासियत म्हणजे हापूस आंबा आणि त्याच बरोबर कोकणची एक आगळी वेगळी ओळख म्हणजे कोकणची लोककला. कोकणच्या प्रमुख लोककलेमध्ये नमन, जाखडी या कलांचा समावेश होतो. त्याचा आस्वाद घेण्यासाठी देशासह परदेशातील अनेक पर्यटक कोकणात येतात. लोककलावंत स्वत:ला झोकून देऊन आपली कला जिवंत ठेवतात. शिमगा आणि गणेशोत्सव यामध्ये या लोककलांवंतांना खरे महत्व प्राप्त होते.

आज सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी मुंबईतील पत्रकार आणि मित्र, पल्लवी फाउंडेशन पुढे सरसावले आहेत आणि त्यातून  राज्यातील गरजू लोक कलावंतांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरीत आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची भेट आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत आहोत, असे श्री. कळंबटे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रम माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीमधील  एकूण ३०० गरजू लोक कलावंतांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, संदीप तावडे,  सचिव राजेश कळंबटे, पत्रकार विजय पाडावे,  राकेश गुडेकर,  तन्मय दाते,  गुरुप्रसाद सांवत,  गणेश भिंगार्डे, सूरज आयरे इत्यादींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular