27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriशिथिलतेनंतर अखेर भाजीपाला दाखल

शिथिलतेनंतर अखेर भाजीपाला दाखल

रत्नागिरीमध्ये मागील आठवडा पूर्ण संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणालाही जिल्ह्यात चौकशी शिवाय प्रवेश बंद होता. त्यामुळे कोरोनाच्या या कालावधीमध्ये भाज्यांचे चढे दर पहायला मिळाले. तसेच संचारबंदी असल्याने फक्त मेडिकल वगळता इतर सर्व किरणा दुकाने, भाजीपाला सर्व पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. रोज जेवणात कडधान्य खाऊन कंटाळलेल्या रत्नागिरीवासियांना अखेर भाजीपाला मिळाला.

रत्नागिरी अनलॉक झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांकडून मिळालेल्या शिथिलतेमुळे रत्नागिरी शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध भाजीपाला भरलेले ८ ट्रक दाखल झाले आहेत. त्यामुळे आठवडाभर वाढलेले दर आता नक्कीच कमी होतील. आलेल्या भाजीपाल्याची लिलाव प्रक्रियाही योग्य रीतीने पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये आत्ता योग्य दरामध्ये भाजीपाल्याची विक्री होणे शक्य होणार आहे.

८ ट्रक भरून आलेल्या भाजीपाल्यामध्ये विविध भाज्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये पडवळ, गवार, टोमेटो, पावटा, मेथी, पालक, शेवग्याच्या शेंगा, मटार, कणीस, घेवडा, भोपळी मिरची, हिरवी मिरची, गाजर, दुधी, कोबी, फ्लॉवर, वांगी, ओल्या भुईमुगाच्या शेंगा, काकडी, वाल, भोपळा, भेंडी, कारली, कोथिंबीर, कांदापात, दोडका, बीट, तोंडली इत्यादी अनेक प्रकारच्या भाज्या रत्नागिरी मध्ये योग्य दरामध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

या भाजीपाल्यांबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे सभापती संजय आयरे म्हणाले कि, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भाजीपाला रत्नागिरीकरांना मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. आलेल्या या सर्व भाजीपाल्याचा लिलाव छत्रपती शिवाजी सभागृहाच्या लिलाव गृहामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे सभापती, उपसभापती, सचिव आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

RELATED ARTICLES

Most Popular