22.2 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeMaharashtraयुवराजांची कायमच दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

युवराजांची कायमच दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेले व्यंगचित्र देखील काढले आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. पण, आज विरोधकांकडून नाही तर सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ‘युवराजांची कायमच दिशा चुकली’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेले व्यंगचित्र देखील काढले आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठकरुन बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसत आहेत.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनात आंदोलन करत आता पर्यंत पावसाळी अधिवेशन कायमच गाजवलं. मात्र, आज विधानभवनात काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं. यावेळी सत्ताधाराऱ्यांकडून महाविकास आघाडीविरोधात हातात पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिंदे गटातील आमदारांनी हे आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या हातातील पोस्टर हे अत्यंत सूचक होतं. ‘युवराजांची कायमच दिशा चुकली’, असं पोस्टर झळकवत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल चढवला होता.

पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकामंधील संघर्ष पाहायला मिळत आहे. काल विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये बाचाबाची झाली, हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. तर आज शिंदे गटाकडून थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीवरही हल्लाबोल करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून लवासाचे खोके, बारामती ओके, दाऊदचे खोके, महाविकास आघाडी ओके, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा सुरु आहेत अशी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांना हवी ती मंत्रिपद मिळाली नाहीत म्हणून हे सगळे वरिष्टांची मर्जी राखण्यासाठी चालू आहे. राज्यात खूप प्रश्न आहेत ते घेऊन पायऱ्यांवर उभे राहिले असते तर नक्कीच बरं वाटलं असतं. मला त्यांच्याबद्दल सहानभूती आहे. मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्या चेहऱ्यावर हवे ते पद न मिळाल्यामुळे निराशा दिसत आहे. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे. पण हे नक्की सांगेन कि त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular