25.6 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरीत महायुतीमध्ये शिंदे गटाच्या नाराजीनाट्य...

रत्नागिरीत महायुतीमध्ये शिंदे गटाच्या नाराजीनाट्य…

राजीनामे नाराजीमुळे दिले की वैयक्तीकस कारणास्तव याचीही चर्चा सुरू झाली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. सोशल मीडियावर हे राजीनामे तातडीने व्हायरल झाले आहेत. जिल्हा युवा सेना अध्यक्ष मुन्ना देसाई तसेच उपतालुकाप्रमुख संदीप नाखरेंकर यांनी दिलेल्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र हे राजीनामे वैद्यकीय किंवा वैयक्तीक कारणास्तव दिल्याचीही चर्चा सुरू आहे त्यामुळे नेमके राजीनामे नाराजीमुळे दिले की वैयक्तीकस कारणास्तव याचीही चर्चा सुरू झाली.

मतदारसंघावर दोघांचाही दावा – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना दोन्ही पक्ष आग्रही होते. या लोकसभा मतदारसंघात आजबर शिवसेनेचाच खासदार निवडून येत असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी असा दावा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केला होता. या जागेसाठी किरण उर्फ भैय्या सामंत इच्छुक होते. गेले महिनाभर ते सातत्याने आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु अखेरच्या क्षणी भाजपने मारायणराव राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसैनिक नाराज झाले असल्याची चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर राजीनामासत्र – किरण सामंत यांना उमेदवारौ न मिळाल्यामुळे वैयक्तिक कारण देत युवा सेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे व्हॉटस्प स्टेटसद्वारे जाहीर केले आहे. मुन्ना देसाईनंतर उपतालुका युवा अधिकारी संदीप नाखरेकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून प्रकृती अस्वास्थ व आर्थिक कारणामुळे राजिनामा देत असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल वृत्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular