29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunचिपळूण शिरगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर टाच, राष्ट्रवादी पेचात

चिपळूण शिरगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर टाच, राष्ट्रवादी पेचात

तक्रारीनुसार कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी कागदपत्रे घेऊन कोकण विभाग आयुक्त यांच्यासमोर हजर राहण्याचे पत्र चिपळूण पंचायत समिती यांनी शिरगाव ग्रामपंचायतीला पाठवले आहे

चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीवर मागील ५ वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या वेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि गलथान कारभार केल्याची तक्रार कोकण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारीनुसार कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी कागदपत्रे घेऊन कोकण विभाग आयुक्त यांच्यासमोर हजर राहण्याचे पत्र चिपळूण पंचायत समिती यांनी शिरगाव ग्रामपंचायतीला पाठवले आहे. सध्या शिरगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न सुरू आहेत; मात्र या पत्रामुळे राष्ट्रवादी गोत्यात आली आहे.

सदर अहवालामध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी २८ नोव्हेंबरला नवी मुंबईतील कोकण विभागीय आयुक्त येथे उपस्थित राहावे, असे पत्र चिपळूण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी शिरगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांना पाठवले असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे पत्र ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांच्या हाती पडले असून, शिरगावमधील राष्ट्रवादीच्या सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत कमिटी सदस्यावर भ्रष्टाचार व अनियमिता तसेच गलथान कारभाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. कलम ३९ (१) नुसार कारवाई करण्याबाबत कोकण विभाग विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. शिरगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यात सुधीर शिंदे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुधीर शिंदे नेमके कोणते पाऊल उचलत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पत्रामुळे राष्ट्रवादी गोत्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक अटळ आहे; मात्र या सर्वांमध्ये ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular