28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraएमआयआर कक्षामध्ये केलेल्या शूटवरून शिवसेना आक्रमक

एमआयआर कक्षामध्ये केलेल्या शूटवरून शिवसेना आक्रमक

कारागृहातुन बाहेर आल्या नंतर नवनीत राणा घरी न जाता त्या थेट लीलावती रुग्णालयामध्ये भरती झाल्या.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नवनीत राणांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी १२ व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी ५ ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते.

कारागृहातुन बाहेर आल्या नंतर नवनीत राणा घरी न जाता त्या थेट लीलावती रुग्णालयामध्ये भरती झाल्या. छाती, मान आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना तसेच स्पॉन्डिलायटिसचा त्रास होत असल्याने त्यांचे एमआरआय स्कॅन आणि संपूर्ण बॉडी चेक अप करण्यात आले. मात्र, यावेळी रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आले.

एमआयआर कक्षामध्ये एरव्ही कोणतेही इलेक्ट्रोनिक उपकरण नेण्याचीही परवानगी नसते. तर तिथे केलेल्या शूट वरून मात्र शिवसेना आक्रमक झाली आहे. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले आहे. आणि सोबतच कोणी चित्रीकरण केले याबाबत विचारणा केली आहे.

लीलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून वांद्रेमधील पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांचे एमआरआय सुरू असताना फोटो कसे काय काढायला परवानगी दिली! यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय कक्षातील फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शिवसेने देखील हा मुद्दा लावून धरत लीलावती रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचा फोटो मनीषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवला. या सर्व प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाला देखील प्रचंड डोकेदुखी झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular