22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraदहावी आणि बारावी परीक्षांच्या निकाल ह्या तारखेला...

दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकाल ह्या तारखेला…

१० जूनपर्यंत दहावी तर २० जूनपर्यंत बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. १० जूनपर्यंत दहावी तर २० जूनपर्यंत बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन निकाल पाहणे देखील शक्य होणार आहे.

परीक्षेच्या शेवटच्या पेपरनंतर ६० दिवसांच्या कालावधीत निकाल जाहीर केला जातो. पण यंदा बारावीचा १५  दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा म्हणजे १० जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. बारावीच्या परीक्षेला यंदा १४.७२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर १६.२५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र एसएससी आणि एचएससीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा स्कोअर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन तपासून आणि डाऊनलोड करु शकतील.

पेपर तपासण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्यांमध्ये बार कोड स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आता बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालांसाठी १० आणि २० जून या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular