माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून विशेष घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अख्ख्या जगामध्ये सर्वाना माहिती आहे. परंतु, अनेक दिलेल्या माहिती या अपूर्ण किंवा केवळ ऐकीव असते. त्याबद्दल इत्यंभूत आणि विस्तारित रुपात माहिती मिळण्यासाठी आणि महाराजांची प्रचिती संपूर्ण विश्वाला माहित होण्यासाठी एक विशेष पद्धतीचे ग्रंथालय रत्नागिरीमध्ये तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी जनतेला दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अखंड महाराष्ट्राबरोबरच देशासह जगालाही कळावी यासाठी रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील संशोधन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय तयार करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली.
६ जून रोजी शिवस्वराज्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने सातार्यातील शाहू कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ना. उदय सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कौशल्याने स्वराज्याची स्थापना केली. त्याचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतचे संशोधन केंद्र आणि ग्रंथालय हे स्थापन करण्यात येणार आहे.
जगातील कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत माहिती हवी असल्यास त्यांना महाराष्ट्राच्या मातीतच येऊन महाराजांबद्दल माहिती घ्यावी लागेल. त्या बरोबरच शिवाजी महाराजांची चरित्र साधना समिती तयार करण्यात आली असून त्याच्या सदस्य सचिवपदी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी त्यावेळी केली.महाराजांचा इतिहास, गड किल्ले आताच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा देखील हा एक प्रयत्न आहे.