27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा, लांबलचक रांगा

रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा, लांबलचक रांगा

गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते.

ऐन सुट्टीच्या हंगामात सीएनजीचा तुटवडा भासत असल्याने रिक्षाचालकांसह अन्य वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गेले पंधरा ते वीस दिवस ही परिस्थिती आहे. जिल्ह्यात सीएनजीवर चालणारी एकूण ८ हजार ७१७ वाहने आहेत. गॅस पंपावर उपलब्ध झाल्यानंतर तो भरण्यासाठी सीएनजी वाहनधारकांना दोन ते तीन तास रांगेत राहावे लागत आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरीत दाखल होत आहेत.

पर्यटक रणरणत्या उन्हामध्ये रिक्षा किंवा छोट्या मोटारी भाड्याने घेऊन पर्यटन करतात. हाच हंगाम रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रवासी भाडे मिळण्याचा आहे; परंतु ज्या रिक्षा सीएनजीवर चालतात त्या रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यात अडचणी येत आहेत. सीएनजी पंपावर मुबलक गॅस उपलब्ध नाही. गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते. त्यामुळे वेळेत रिक्षा व्यवसाय करता येत नाही.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील नोंदीनुसार वाहनांची संख्या ४ लाख ४१ हजार ७२ वाहने आहेत. त्यामध्ये ३ लाख १२ हजार ९७० दुचाकी वाहनांचा समावेश आहे. म्हणजेच प्रत्येक घरात १ ते २ दुचाकी असल्याने रिक्षा व्यवसाय थंडावला. तरीही सणासुदीच्या दिवसांसह मे महिन्यात चाकरमानी, पर्यटक रत्नागिरीत येतात तेव्हा रिक्षा व्यवसाय बऱ्यापैकी होतो. आता मे महिना असतानाही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular