श्रेया घोषाल च्या घरी नवीन पाहुणा आला आहे गायक श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. आज तिने तिचा पती शिलादित्य मुखोपाध्याय यांच्यासमवेत सोशल मीडिया वरून ही आनंदाची बातमी लोकांना दिली आहे तिने तिच्या सर्व चाहत्यांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार देखील व्यक्त केले आहे श्रेयाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक मेसेज देखील पाठवला आहे की देवाने आज आम्हाला दुपारी मुलाच्या रूपाने एक सुंदर भेट दिली आहे अशी गोष्ट मी याच्या आधी कधीही अनुभवली नव्हती आणि त्यामुळे आमच्या परिवारा मधले सर्व सदस्य खूप खुश आहेत तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद
God has blessed us with a precious baby boy this afternoon. It’s an emotion never felt before. @shiladitya and I along with our families are absolutely overjoyed. Thank you for your countless blessings for our little bundle of joy. ❤️🙏🏻 pic.twitter.com/pDVgSE0yrK
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) May 22, 2021
काही दिवसांपूर्वीच श्रेयाने ती प्रेग्नंट असल्याचे बातमी ट्विट करून सांगितली होती त्यात त्या ट्विटरच्या फोटोमध्ये तिने तिच्या बेबीबंप फोटो देखील शेअर केला होता आणि त्यात म्हटले होते बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे लवकरच आमच्या जीवनाच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे
श्रेया घोषाल आई झाल्याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतो आहे तिची ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी वेगाने तिचे चाहते शेअर करत आहेत याबाबत बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी श्रेयाला अभिनंदनाचे मेसेज पाठवले आहेत २०१५ मध्ये श्रेयाने शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याबरोबर लग्न केले होते दोघेही एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखतात आणि फार कमी मित्र परिवारामध्ये त्यांनी त्यावेळी लग्न केले होते.