27.5 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

iPhone 16 मालिका विक्री सुरू, 5000 रुपयांची झटपट सूट…

Apple iPhone 16 मालिका अधिकृतपणे आजपासून म्हणजेच...

ऋषभ पंतने एमएस धोनीला बांगलादेशविरुद्ध केलेल्या कारवाईची आठवण करून दिली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना...
HomeChiplunचिपळूण शहरातील रस्त्यांची चाळण - नागरिक संतप्त

चिपळूण शहरातील रस्त्यांची चाळण – नागरिक संतप्त

शहराच्या विविध भागांतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

शहरात अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी सध्याची अवस्था आहे. ते बघून हाच काय शहराचा विकास, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काविळतळी भागातील अंतर्गत रस्त्याचे काम मागासवर्गीय फंडातून मंजूर झाले आहे. माजी नगरसेवक अविनाश केळकर यांनी जानेवारीपासून या रस्त्याच्या कामासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. बहादूरशेख मोहल्ला ते शंकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबराचा थर अजिबात शिल्लक नाही. पूर्णपणे रस्ता उखडलेला असून खडीवरून वाहने चालवावी लागत आहेत. काविळतळी ते राहुल गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.

यासह शहराच्या विविध भागांतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्यांवरील असंख्य खड्ड्यांमध्ये पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. हे खड्डे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडवून देत आहेत. काही बेभान वाहनचालकांमुळे खड्ड्यांतील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. अशा घटनांमुळे रस्तोरस्ती वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडत आहेत.

शहरातील डांबरी रस्ते उखडून १० इंचांपासून ते ४ फुटांपर्यंत खड्डे पडल्यामुळे आम्हाला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसामुळे रस्त्यांची दयनीय स्थिती झाली असून, पालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष द्यावे. शहरवासीयांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular