30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeSindhudurgसिंधुदुर्ग जिल्हावासीयांची टोलमुक्तीची आशा मावळली

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांची टोलमुक्तीची आशा मावळली

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

ओसरगाव टोल नाक्‍यावर जिल्हा वासियांसाठी टोल माफी मिळण्यासाठी अनेकांनी आंदोलने केली होती. सर्व पक्षांची एकजूट या कारणी दिसून आली होती. परंतु, या टोल नाक्यावरील टोलवसुलीचा ठेका राजस्थानच्या गणेश घरिया कंपनीला देण्यात आला आहे. ही कंपनी दिवसाला ७ लाख ५२ हजार रुपयांचा टोल वसूल करून शासनाला देणार आहे.

टोल नाक्‍यापासून २० किलोमीटर परिसरातील सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोल नाक्‍यावर ५० टक्‍के सवलत दिली जाणार असून, इतरांना मात्र पूर्ण टोल भरावा लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळणार नसल्याचे एक प्रकारे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ओसरगाव येथील टोल नाक्‍यावर टोलवसुलीचा ठेका यापूर्वी हैदराबाद येथील एमडी करिमुन्नीसा कंपनीला मिळाला होता. मात्र, तीव्र विरोधामुळे ही कंपनी तीन महिन्यांत टोलवसुली करू शकली नव्हती. त्‍यानंतर टोलवसुलीसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्‍या आणि नवीन कंपनी आणि कंत्राटदार नेमण्यात आला आहे.

यामध्ये एकूण तीन कंपन्यांनी टोल वसुलीसाठी टेंडर भरले होते. यात राजस्थान येथील गणेश घरिया कंपनीने प्रतिदिनी सात लाख ५२ हजार ३७८ रुपये टोल वसुली करण्याची निविदा भरली होती. टोलवसुलीची निविदा मंजूर झालेल्‍या गणेश घरिया कंपनीला टोलवसुलीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कंपनीकडून ५२ लाख रुपयांचे डिपॉझिट घेतले जाईल. पुढील आठ दिवसांत या कंपनीबरोबर करार पूर्ण झाल्‍यावर कंपनीला टोलवसुलीची वर्कऑर्डर दिली जाईल. वर्कऑर्डर दिल्‍यावर लगेचच ही कंपनी टोलवसुलीची कार्यवाही करू शकणार असल्‍याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली.

ओसरगाव टोल नाक्‍यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी पूर्वीचे दर निश्‍चित केले आहेत. टोल नाक्‍यापासून २० किलोमीटर परिघातील सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना ५० टक्‍के सवलत असेल. मोटार, जीप आदी छोट्या वाहनांच्या सिंगल एन्ट्रीसाठी ९० रुपये, तर मिनीबस १४५ रुपये, ट्रक आणि बससाठी ३०५ रुपये, तर अवजड वाहनांसाठी ३३५ ते ५८५ रुपयांपर्यंत टोल आकारला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular