22.4 C
Ratnagiri
Wednesday, February 25, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeKhedखेड भाजी मार्केटमधील स्लॅब कोसळला व्यावसायिकांच्या डोक्यावर टांगती तलवार

खेड भाजी मार्केटमधील स्लॅब कोसळला व्यावसायिकांच्या डोक्यावर टांगती तलवार

भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड शहरातील नगरपालिकेच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या छत्रपती संभाजी भाजी मार्केटमधील गेट क्रमांक दोनवरील स्लॅब बुधवारी अचानक कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे संपूर्ण मार्केटमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर उर्वरित स्लॅबही अत्यंत धोकादायक स्थितीत असून, कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. भाजीपाला खरेदीसाठी खेड शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिक याठिकाणी दररोज गर्दी करत असतात. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी भाजी मार्केटमधील दुरवस्थेबाबत वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

मात्र, त्या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, येथे काम करणाऱ्या विक्रेत्यांना धोकादायक ठिकाणीच आपली रोजीरोटी चालवावी लागत आहे. बुधवारी गेट क्रमांक दोनचा स्लॅब कोसळला असला तरी गेट क्रमांक एकसुद्धा उचकटण्याच्या स्थितीत असून, ते कधी कोसळेल याचीही शाश्वती नाही. सध्या संपूर्ण इमारतीची मोजणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे हे भाजी मार्केट नगरपालिकेच्या मुख्य इमारतीचा भाग असून तळमजला आणि दोन मजले आहेत. या वरील मजल्यावर नगरपालिका कार्यालय असून, याठिकाणी दररोज मोठी गर्दी असते…

RELATED ARTICLES

Most Popular