26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriजुनी पेन्शनसह शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

जुनी पेन्शनसह शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू – आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

कोकणातील पाच जिल्ह्यांतील सर्व शाळांना ई-लर्निंग साहित्य दिले आहे.

लवकरच अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्प्यातील वाढ दिली जाईल आणि शिक्षकांनी केलेल्या जुनी पेन्शनसह अन्य प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावू, असा विश्वास कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला. न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजापूर व लांजा तालुक्यांतील सुमारे ३१ माध्यमिक शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार किरण सामंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. लतेश नांदगावकर, गटशिक्षणाधिकारी विनोद सावांग, भाजप लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, विजय कुरूप, गुरुप्रसाद तेली, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव महेश पाटकर, मुख्याध्यापक पाटोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेरवली हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी केले. कार्यक्रमाला लांजा व राजापूर तालुक्यांतील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार म्हात्रे म्हणाले, दोन वर्षांच्या कारकिर्दीत कोकणातील पाच जिल्ह्यांतील सर्व शाळांना ई-लर्निंग साहित्य दिले आहे. त्याचा लाभ कोकणातील हजारो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होत आहे. ई-लर्निंग साहित्यातून शिक्षकांनी दर्जेदार अध्यापन करताना महापुरुषांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे साहित्य व विचारदेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे.

अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करा – सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला तर ते अधिक प्रभावी होईल. खऱ्या अर्थाने शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढवायची असेल तर आमदार म्हात्रे यांनी आमदार निधीतून दिलेले ई-लर्निंग साहित्य शिक्षक व विद्यार्थी यांनी उपयोगात आणले पाहिजे. त्यामधून शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular