30.6 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये...
HomeKokanआज पासून रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी सुरु

आज पासून रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी सुरु

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आज पासून सुरु झालेल्या मेमू स्पेशल गाडीचा नक्कीच फायदा होणार आहे कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा, यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे. सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. तसेच थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर-मडगाव ट्रेन गणेशोत्सव कालावधीत देखील सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

या आधी काही वर्षापूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत पनवेल ते चिपळूण अशी मेमू ट्रेन चालवण्यात आली होती; मात्र, रोहयाच्या पुढे कोकण रेल्वेमार्गावर चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७ / ०११५८ ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी १९, २१ ऑगस्ट २०२२, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर, १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही मेमू स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल. त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी हि नक्कीच गुड न्यूज ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular